कराडच्या बापूजी साळुंखे महाविद्यालयातील नेहा निकमची साऊथ-वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

0
2

कराड प्रतिनिधी । कराड येथील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात (B.com II) मधील नेहा निकम या विद्यार्थिनीची उदयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या साऊथ-वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी क्रिकेट स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघात नुकतीच निवड झाली आहे.

नेहा निकम हिच्या निवडीबद्दल संस्थेचं कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ. सतीश घाटगे, महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

कराड येथील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात (B.com II) मधील नेहा निकम या विद्यार्थिनीस स्पर्धेसाठी शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग प्रमुख प्रा.देवदत्त महात्मे, कनिष्ठ विभागाचे गौरव पाटील व सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.