‘लाडकी बहीण’ला कुणीही दूषित नजरेने पाहू नये; नीलम गोऱ्हे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्यातील वातावरण गढूळ असलं तरी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमुळे महिलांत उत्साहाचे वातावरण आहे. यातून राज्यातील अडीच कोटी बहिणींना लाभ मिळेल. त्यामुळे या योजनेकडे दूषित म्हणून पाहू नये. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात महायुतीलाच चांगले यश मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदे गटाच्या उपनेत्या ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान, त्यांनी लाडकी बहिण योजनेवरुन काहीसावत्र भावांना पोटशूळ उठला आहे, अशी टीका त्यांनी केली.

सातारा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रेअंतर्गत जिल्ह्यातील महिलांचा मेळावा गुरुवारी पार पडला. या मेळाव्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोहे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सांगली संपर्कप्रमुख सुनीता मोरे, सातारा जिल्हा महिला प्रमुख शारदा – जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपसभापती गोन्हे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या वेळी सातारा येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने येणे झाले होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला संमिश्र यश मिळाले. शिवसेनेचेही सात खासदार निवडून आले आहेत. आताच्या विधानसभा निवडणुकीतही युतीला यश मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. याची मदत याच महिन्यात महिलांना मिळणार आहे. या योजनेमुळे महिलांत आत्मविश्वास आला असून उत्साह निर्माण झालेला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत दीड कोटी अर्ज आले आहेत. १५ लाखांच्या आसपास नामंजूर झाले आहेत, असे सांगून उपसभापती गोऱ्हे पुढे म्हणाल्या, ज्या महिलांचे अर्ज बाद झालेत, ते कायमस्वरुपी नाहीत. काही तांत्रिक चुका राहिल्या असतील. तरीही काही महिला या योजनेपासून दूर राहिल्या तरी त्यांना इतर योजनांमधून लाभ देता येऊ शकतो. विधानसभा निवडणुकीपुरतीच ही योजना नाही. कायमस्वरुपी योजना चालणार आहे. त्यामुळे या योजनेबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

लाडकी बहिण योजनेवरुन काही सावत्र भावांना पोटशूळ

महिला सन्मानाची भाषा कोण करत आहे, ज्यांच्या पक्षाचे नेते सभागृहात आई, बहिणीवरुन शिवीगाळ करतात. ज्या पक्षाचे नेते त्या सपना काटकर यांना जीवे मारण्याची धमकी देतात, काढा त्या संजय राऊतांचे कॉल रेकॉर्डिंग, लोकशाहीच्या मंदिरात महिला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या डायसवर असताना अश्लिल भाषा वापरली जाते, अशा शब्दांत शिंदे गटाच्या उपनेत्या ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान, त्यांनी लाडकी बहिण योजनेवरुन काहीसावत्र भावांना पोटशूळ उठला आहे, अशी टीका त्यांनी केली.