कराड प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ दुर्गम भागात असलेल्या इर्शाळ गडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याची दुर्घटना नुकतीच घडली. या ठिकाणचे बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर NDRF ची टीम आज बुधवारी दुपारी 3 वाजता कराडात दाखल झाली.
सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या दरम्यान जिल्ह्यात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता रायगड येथील इर्शाळवाडी या ठिकाणी असलेले NDRF च्या अतिमला आज दुपारी कराडात पाचारण करण्यात आले.
इर्शाळवाडीहून NDRF ची टीम थेट कराडात दाखल pic.twitter.com/iZVBYqw9aY
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 26, 2023
कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय केंद्र या ठिकाणी NDRF टीमचे निरीक्षक राहूल कुमार रघुवंश हे आपल्या इतर २५ कर्मचाऱ्यांसह आज ठीक 3 वाजता दाखल झाले. या NDRF च्या टीममध्ये एका अधिकाऱ्यासह २५ जणांचा पथकात समावेश आहे. यावेळी या टीमने सोबत स्पीड बोटी, लाईफ जॅकेटसह सर्व सामग्री आणली आहे. सध्या हि टीम कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय केंद्र या याठिकाणी वास्तव्यास आहे.