अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर NDRF चे पथक कराडात दाखल

0
144
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. तसेच काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहे. दरम्यान अजूनही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागा अंतर्गत अतिवृष्टीच्या भागात मदत कार्य करण्यासाठी एनडीआरएफ चे पथक तैनात करण्यात आले आहे. यातील एक पथक आज कराड येथे दाखल झाले.

आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांचे मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यात मान्सून कालावधीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एन. डी. आर. एफ. चे एक पथक तैनात करण्यात आले असून हे पथक आज कराड येथे दाखल झाले असता एन.डी.आर.एफ. पथकाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी स्वागत केले. या पथकामध्ये एकूण 25 व्यक्तींचा समावेश आहे.

यामध्ये दोन अधिकारी व जवान यांचा समावेश आहे. जलद आणि तात्काळ मदत पोहोचविणे तसेच शोध व बचाव कार्य जलद गतीने होण्यासाठी या पथकाचा सातारा जिल्ह्याला उपयोग होणार आहे. एन. डी. आर. एफ. च्या पथकाकडे एकूण तीन बोटी त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत उपयोगी होणारे सर्व शोध व बचाव कार्य इत्यादी साहित्यांचा समावेश आहे.