राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी होणार सातारा जिल्ह्यात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी (दि.४) सातारा जिल्ह्यात येत असून पहिल्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत व जिल्ह्यातील आजी, माजी आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी सकाळी ११ वाजता दहिवडी येथील बाजार पटांगणावर जाहीर सभा होणार आहे. दुपारी ३.३० वाजता ही यात्रा सातारा शहरात येणार असून दुपारी ३.३० वाजता पोलिस करमणूक केंद्रात जाहीर सभा होणार आहे.

त्यानंतर सायंकाळी सहा वाजता खेड नांदगिरी (ता. कोरेगाव) येथे जाहीर सभा होणार आहे. ही शिवस्वराज्य यात्रा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे आणि जिल्हयातील आजी माजी आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

जिल्ह्यात शिव स्वराज्य यात्रेची जय्यत तयारी : जिल्हाध्यक्ष सुनील माने

शिवस्वराज्य यात्रा सातारा जिल्ह्यात येणार असल्याने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने यात्रेच्या स्वागताची व विविध ठिकाणच्या सभांची जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनील माने ‘हॅलो महाराष्ट्र‘ शी बोलताना दिली.