सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत आठवडाभरात निर्णय घेण्याचे सूतोवाच खा. शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत नुकतेच दिले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनी आपली ताकद आजमावायला सुरुवात केली आहे. आठवडाभरात सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबई येथील बैठकीत साताऱ्यातून खा. श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, सुनील माने, पाटणकर यांनी उमेदवारी मागितली तर माढ्यासाठी अभयकुमार जगताप इच्छुक आहेत. याशिवाय ऐनवेळी कोण उमेदवारीचा पत्ता बाहेर काढणार याचीही उत्सुकता आहे.
मुंबई येथे नुकतीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजित पाटणकर, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, प्रभाकर देशमुख, कविता म्हेत्रे, मकरंद बोडके, डॉ. नितीन सावंत, डॉ. सतीश बाबर, ॲड. नीलेश डेरे, राजाभाऊ काळे, शंकर शेडगे, गुरुदेव शेडगे, सचिन जाधव, प्रशांत पवार उपस्थित होते.