जिल्हा कारागृहातील बंदीसाठी आयुष्मान भारत कार्डसह विविध उपक्रमांचे उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । समता फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहामध्ये विविध कार्यक्रम तसेच शिबीर नुकतेच घेण्यात आले. कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक श्री अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्ड व ई-श्रम कार्ड यांचे वाटप देखीलकरण्यात आले.

यावेळी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, समता फाउंडेशनची टीम व इतर अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक श्री. अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून कारागृहातील बंद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी सहजतेने बोलता यावे, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व ई-मुलाखत सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा कारागृहातील बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी प्रत्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क, संवाद साधता यावा यासाठी ई-मुलाखत कक्षाचे उद्घाटन श्री गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कक्षामध्ये ई-मुलाखतीसाठी दोन लॅपटॉप उपलब्ध करण्यात आले आहेत. ज्यामध्ये बंद्यांचे नातेवाईक ऑनलाईन लिंकद्वारे कनेक्ट होऊन बंदी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलिंग सिस्टीमद्वारे प्रत्यक्ष संवाद साधू शकतात व पाहू देखील शकतात. तसेच न्यायालयामध्ये प्रत्यक्ष हजर करण्यासाठी देखील दोन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग युनिट उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

आयुष्यमान भारत कार्ड

सातारा जिल्हा कारागृहात आजपर्यंत एकूण 71 बंदींचे आयुष्मान भारत कार्ड काढण्यात आले आहे. यामुळे कारागृहातून बंदी सुटल्यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना एकूण 5 लाख रुपयांच्या आतील आजारांवर उपचार मोफत घेता येणे शक्य होणार आहे.

ई – श्रम कार्ड

कारागृहातील बंद्यांचे ई-श्रम कार्ड देखील काढण्यात आलेले आहे. सातारा कारागृहातील आज एकूण 10 बंदींचे ई-श्रम कार्ड काढण्यात आले आहे. या कार्डमुळे कारागृहातील बंदी कारागृहातून सुटल्यानंतर खाजगीमध्ये काम करत असताना त्याला कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास त्यामध्ये 1 लाखापर्यंतचा विम्याची सवलत त्याला मिळणार आहे. तसेच अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाखापर्यंत या कार्डमार्फत कुटुंबीयांना मदत मिळणार मिळू शकते.

स्कीन चेकअप कॅम्प

सातारा जिल्हा कारागृहामध्ये एकूण 330 बंदी असून या बंद्यांचे स्किन चेक अप करणे आवश्यक असते. त्याबाबत सातारा कारागृह अधीक्षक यांनी समता फाउंडेशनचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम अगरवाल यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचे स्किन कॅम्प घेण्याबाबत विनंती केली होती. त्याच अनुषंगाने आज कारागृहात स्कीनचे कॅम्प घेऊन कारागृहातील सर्व बंद्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिराचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक श्री अमिताभ गुप्ता यांनी केले. यामध्ये एकूण 24 बंद्यांना त्वचारोग निदानानुसार मोफत औषधोपचार करण्यात आले. डॉक्टर श्री विजय सुतार व सौ कविता सुतार यांनी बंद्यांची तपासणी करून उपचार केले.

आय चेक-अप कॅम्प

कारागृहात असणाऱ्या वयोवृद्ध बंदयांच्या डोळ्याबाबतच्या समस्या अनेक वेळा असतात. यासाठी देखील समता फाउंडेशनच्या वतीने कारागृहात आय चेकअप कॅम्प घेण्यात आला. यामध्ये कारागृहातील बंद्यांचे चेकअप करून एकूण 34 बंद्यांना योग्य ते औषध उपचार करण्यात आले. या चेक-अप नंतर ज्या बंदींना चष्मा लागला असेल, त्यांना मोफत चष्म्याची वाटप देखील लवकरच करण्यात येणार आहे. सदर नेत्र शिबिरासाठी डॉक्टर निकिता देशमुख यांनी बंद्यांची तपासणी व उपचार केले.

भजन साहित्याचे वाटप

कारागृहातील बंदयांच्या मनोरंजनासाठी तसेच भक्ती संगीतासाठी, भजन व कीर्तनासाठी समता फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून भजनाचे विविध साहित्य बंद्यांना भेट देण्यात आले. यामध्ये मृदुंग, पेटी, टाळ, तबला इत्यादी साहित्य भेट म्हणून देण्यात आले.

खेळ साहित्याचे वाटप

कारागृहातील बंदींना गुन्हापासून परावृत्त करण्यासाठी तसेच सतत गुन्ह्यांची चर्चा व विचार करू नये व त्यांचा वेळ खेळामध्ये जावा यासाठी समता फाउंडेशन यांच्याकडून विविध खेळांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये कॅरम, हॉलीबॉल, चेस अशा विविध खेळांच्या साहित्याची भेट बंद्यांना देण्यात आली.

महिला बंद्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन

या कारागृहात अनेक महिला बंदी विविध गुन्ह्यांमध्ये बंदिस्त आहेत. त्यांची देखील वैद्यकीय तपासणी स्किन कॅम्प आय कॅम्प इत्यादी तपासण्या नियमित करण्यात येऊन त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्यात येत असते. समता फाउंडेशन यांच्याकडून कारागृहातील महिला बंद्यांसाठी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले आहे.