सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रभारीपदी आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार शिंदे यांना दिले आहे. त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली गेली आहे.
आ. शशिकांत शिंदे यांच्यावर आगामी काळासाठी नवीन जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. आ. शशिकांत शिंदे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांवर पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे.
पक्षाची संघटनात्मक बांधणीसोबतच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे विचार सर्वदूर पोचविण्याचे काम दिले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.