सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यावर भाजप महायुतीने कब्जा केला. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी सत्ता घेचून महाविकास आघाडीतील सर्व उमेवारांना पराभूत केले. विधानसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले वाटेत ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे होय. या अनुषंगाने सर्वच पक्ष तयारी लागले असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक उद्या रविवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलाय आहे.
साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये उद्या रविवार, दि. 16 सकाळी 10 वाजता येथील आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आ. शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) तसेच जिल्ह्यातील आजी-माजी आमदार- खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
साताऱ्यात उद्या होणाऱ्या महत्वाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांच्याबाबत, जिल्ह्यातील मतदार संघातील पक्षाची असणारी परिस्थिती यासह विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीस पक्षाचे तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, सर्व कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहवे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.