कराड प्रतिनिधी । राष्ट्रीय सेवा योजना हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. याचबरोबर शिबिर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवीण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावते. एकूणच विद्यार्थ्यांची जडणघडनीत व सर्वांगीण विकासात राष्ट्रीय सेवा योजन असे मत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर येथील कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे यांनी व्यक्त केले.
लवंडमाची ता. वाळवा येथे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हरूगडे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाडगे हे होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून लवंडमाची गावच्या सरपंच सौ छाया दूरर्गावळे, उपसरपंच उत्तम डिसले ,ग्रा. पं. सदस्य रामदास सरोदे, यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीराम साळुंखे म्हणाल, महापुरुषांचा आदर्श घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे. दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासारखे सुख नाही.हे सर्व गुण आपल्याला राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून शिकण्यास मदत होते. सामाजिक कार्याची आवड व स्वच्छता हे एनएसएस विभागातून शिकण्याचा गुण निर्माण होऊन वाढीस लागण्यास मदत होते.
इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हरूगुडे म्हणाले, विद्यार्थ्यांत सामाजिक कार्याबरोबर देश प्रेम नसानसात भीनवीण्याचे काम अशा शिबिरातून होते. थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे तरुणांनी आवश्यक असून सोशल मीडियाचा जागरूकतेने उपयोग करावा असे सूचित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे म्हणाले, एन एस एस मधून विद्यार्थ्यांच्या ठिकाणी स्वयंशिस्त निर्माण होते. निस्वार्थी भावाने केलेली श्रमपूजा ही ईश्वर पूजा ठरते. विद्यार्थ्यांना आजच्या युगातही श्रम संस्कृती शिवाय पर्याय नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आपल्या मनोगतात प्रा.पिरजादे म्हणाले, देशसेवा व प्रामाणिक कर्मवृत्ती जोपासणारे देश आज प्रगती पथावर आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेतून ही वृत्ती जोपासण्यास मदत होते. प्रास्ताविक प्रा. सुभाष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका शितल गायकवाड यांनी केले. तर आभार प्रा. ए.यू पाटील यांनी मानले. या उद्घाटन कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सदस्य बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे एनएसएस विभागाचे प्रमुख, सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी – विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.