सातारा प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नारिशक्ती वंदन विधेयक मंजूर करून महिलांना न्याय दिला. तसेच महिलांच्या उन्नतीकरणासाठी अनेक योजना देखील आखल्या आणि राबवून त्या पूर्ण केल्या. या अनुषंगाने आज साताऱ्यात देखील भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या नारिशक्ती वंदन दौडचे आयोजन करण्यात आले. शहरातील शिवतीर्थ ते आनंदवाडी दत्त मंदिर या मार्गांवर भाजप महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ सुनीषाताई शहा यांच्या संयोजनाखाली नारिशक्ती वंदन दौड काढण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते झेंडा दाखवून दौडला सुरुवात करण्यात आली.
यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभीताई भोसले, कोरेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख प्रियाताई शिंदे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखाताई माने कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवर्णा पाटील, स्वाती पिसाळ, प्रदेश चिटणीस सुनीषा शहा, कविता कचरे, अरुणा बंडगर पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, डॉ सचिन साळुंखे, धनंजय पाटील, रवी आपटे, चिटणीस निशा जाधव, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस जिल्हा सरचिटणीस वैष्णवी कदम, दैवशिला मोहिते, बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर उपस्थायीत होते.
शेवटी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते आनंदवाडी दत्त मंदिर येथे बक्षीस समारंभ करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष गौरी गुरव, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष कल्याण राक्षे, महिला मोर्चा सातारा शहराध्यक्ष रीना भनगे, रोहिणी क्षीरसागर, वैशाली भिलारे, सविता पवार, कुंजा खंदारे, वैशाली टंगसाळे, पायल जाधव, चित्रा माने, नंदा इंगवले, वंदना उत्तेकर, दामिनी सपकाळ, दिपाली कदम, भारती गस्ती, रेणुका ढोणे, सुवर्णा काळे, रोहिणी क्षीरसागर, विजयश्री देशपांडे, कलावती ढोणे, नितीन बर्गे, डॉ शेखर घोरपडे, धीरज सोनवले, यशराज माने, राजन मामनिया, गीता मामनीया, अभिजित माने, तनिश शहा, निलेश शहा, तुषार डोकेफोडे, सचिन मालवणकर, भरत मूनोत यांची प्रमुख उपस्थिती होती.