सातारा प्रतिनिधी । “लोकसभा निवडणुकीवर लक्ष द्यायचं की स्वतःच उघड व्हायचं, हे शशिकांत शिंदे यांनी एकदाचे ठरवावे, ते वयाने मोठे असले तरी विचाराने बालिश आहेत,” अशी घणाघाती टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्याच्या अनुषंगाने नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदेंवर काही दिवसांपूर्वी निशाणा साधला होता. त्यानंतर आज पाटील यांनी संत्र्यात पुन्हा पत्रकार परिषद घेत आमदार शिंदे यांच्यवर टीका केली. यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, “मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्याबाबत ज्या याचिकाकर्त्याने तक्रार दिली होती, त्याचे तोंड देखील मी पाहिलेले नाही. शशिकांत शिंदे यांना अधिकची माहिती हवी असेल तर कोर्टाच्या परवानगीने आम्ही कागदपत्रे मिळवून देऊ. केस माघारीसाठी फेरी याचिका दाखल केली होती, याची चौकशी उच्च न्यायालयाने लावलेली आहे. संबंधित याचिकाकर्त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. त्या आत्महत्येशी माझा काही संबंध असेल त्याचे रेकॉर्डिंग आमदार शिंदे यांनी द्यावे.
संबंधित याचिका करता जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याला कोण कोण भेटलं? कोणा-कोणाचे फोन आले? त्याचं सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या निवडणुकीवर भर द्यावा, ते दुसऱ्याला उघड करायला गेले तर स्वतःच उघडे पडतील. जसे प्रश्न उपस्थित करतील तसे उत्तर देखील येईल, त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी काय ते ठरवावे? असा सूचक इशारा नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिला.