सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणाबाबत लढणारे मनोज जरांगे – पाटील यांच्याकडून राज्यभरात दौरे केले जात आहेत. तसेच ठिकठिकाणी सभा घेत आरक्षणाबाबत मागणी केली जात आहे. या दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यावेळी जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने त्यावर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छगन भुजबळ तुमची शेपटी नेमकी कोणत्या प्राण्याची हे जाहीर करावे. कोणत्या प्राण्याची शिकार कशी करायची ते मराठ्यांना माहिती आहे. जरांगेच्या विरोधातील वक्तव्य खपवू घेणार नाही, अशा इशारा पाटील यांनी दिला.
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर आज निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, भुजबळांची शेपटी नेमकी कशी आहे मलाचा कळायचा मार्ग नाही. हि कोणत्या प्राण्याची व्याख्या आहे हे त्यांनी जाहीर करावी. मग आम्हाला कुठे आणि कशी शिकार कार्यची आहे ती आम्ही करू, असा इशारा पाटील यांनी दिला.
भुजबळ काय म्हणाले होते?
अंबड शहरात पाचोड मार्गावरील धाईतनगरात शुक्रवारी ओबीसी – भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा झाली. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता प्रचंड मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव या सभेला उपस्थित होते. यावेळी ओबीसी नेते, तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाण साधला होता. यावेळी ते म्हणाले कि, ‘‘याद राखा..! पुन्हा माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नका, सतत ओबीसी आमच्या हक्काचे खातात, असे बोलता, आम्ही तुमचे खातो का?’’ २७ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण कसे? असा प्रश्न जरांगे उपस्थित करतात. त्यावर मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.