राजकारणातील सर्वात मोठी बातमी; शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी नरेंद्र पाटलांची हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राजकारण म्हटलं कि एकमेकांचे कायमचे शत्रू असे काहीजण मानतात. मात्र, मोठ्या नेत्यांमध्ये राजकारण जरी होत असले तर त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध कायम असतात. याचाही प्रचिती आज कोरेगाव विधानसभा मतदार संघात पाहायला मिळाली. सातारा जिल्ह्यातील राजकारणातील एक मोठी घडामोड कोरेगाव विधानसभा मतदार संघात घडली आहे. महायुतीतील भाजपमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र समजल्या जाणार्या माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी हजेरी लावली आहे. शिंदेंच्या उमेदवारी राज भरण्यास पाटलांनी हजेरी लावल्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

शशिकांत शिंदे यांनी आज कोरेगाव विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या अर्ज भरण्यास नरेंद्र पाटील यांनी उपस्थिती लावली. इतकेच नाही तर शिंदेंची गाडी स्वतःहून चालवत स्टेअरींग देखील हातात घेतले. शिंदेंचा हात हातात घेता त्यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात गेले. आज नरेंद्र पाटल्या यांनी शशिकांत शिंदेंच्या अर्ज भरण्यासाठी हजरेची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात सुराउ झाली आहे.

लोकसभेवेळी केली होती टीका

लोकसभेचा सातारा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ‘तुतारी’ चिन्हावरील उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीत घोटाळा करतो हे खूपच लांच्छनास्पद असल्याचा हल्लाबोल आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर चढवला होता. लोकसभेवेळी नरेंद्र पाटील यांनी मुतारीचा घोटाळा बाहेर काढून शशिकांत शिंदे यांना चांगलेच खिंडीत पकडले होते. नरेंद्र पाटलांच्या टीकेची चांगलीच चर्चा लोकसभा निवडणुकीवेळी झाली होती.

काल शंभूराज देसाई तर आज शशिकांत शिंदे

माथाडी नाइट नरेंद्र पाटील यांनी काल उत्पादनशुल्कमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजरेई लावली होती. मात्र, आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यास देखील हजेरी लावली.

महायुतीसह महेश शिंदेंना धक्का!

एकमेकांचे विरोधक झालेले शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांनी एकत्रित आले आहेत. कोरेगाव विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या उमेदवारी राज भरण्यासाठी पाटलांनी लावलेली हजेरी हि महायुती आणि शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांच्यासाठी धक्का देणारी घटना मानली जात आहे.