साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात महाराणी येसुबाईंची नाममुद्रा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ऐतिहासिक वाघनखांबराेबरच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची नाममुद्रा प्रथमच पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. गोलाकार व एक इंच व्यासाची अस्सल चांदीची फारशी भाषेत असणारी ही नाममुद्रा पाहण्याची संधी पहिल्यांदाच मिळत आहे. वाघनखांबरोबरच ही नाममुद्रा देखील इतिहास प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

नाममुद्रा साधारणपणे १९७६ रोजी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई येथून साताऱ्यातील वस्तुसंग्रहालयात सामील झाल्याची नोंद आहे. येसूबाईंची नाममुद्रा ही फारशी भाषेत आहे. या मुद्रेवर तीन ओळींचा लेख आहे. तो वाचताना खालून वर असा वाचावा लागतो. राजा सनह अहद वलिदा राजा शाहू यांच्या मातोश्री येसूबाई, असे शब्द नाममुद्रेवर आहेत. यातील सनह अहद या शब्दाचा अर्थ पहिले वर्ष असा आहे. पारशी भाषेतील प्रथम वर्षाला अहद असे म्हंटले जाते.

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात येसूबाईंची नाम मुद्रा पाहण्यास ठेवण्यात आली असून ही नाम मुद्रा बघण्यासाठी शिवप्रेमी त्याचबरोबर इतिहास अभ्यासकांकडून मोठ्या संख्येने गर्दी केली जात आहे. भारतातील दुर्मिळ आणि एकमेव नाममुद्रा ही सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

अशी आहे नाममुद्रा…

  • प्राचीन काळापासून शिक्क्यांचा वापर होत आला आहे. शिक्का म्हणजे ‘नाममुद्रा’ आणि मोर्तब म्हणजे ‘समाप्तीमुद्रा’.
  • महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा गोलाकार असून तिचा व्यास एक इंच आहे.
    छत्रपतींच्या नाममुद्रा देवगिरी व संस्कृत लिपीत आढळतात. मात्र, येसूबाई यांची नाममुद्रा फारसी भाषेत आहे.
  • या मुद्रेवर तीन ओळीचा लेख आहे. ‘राजा सनह अहद वलिदा राजा शाहू यांच्या मातोश्री येसूबाई’ असा त्याचा अर्थ आहे.
  • यातील ‘सनह अहद’ या शब्दाचा अर्थ पहिले वर्ष असा आहे. फारसी भाषेत प्रथम वर्षाला अहद असे म्हणतात.
  • या नाममुद्रेबरोबर ‘मोर्तब सूद’ अशी लहान आकाराची आणखी एक मुद्रा असून पत्राच्या शेवटी याचा वापर केला जात असावा.
  • मुद्रांवरील अक्षरे उलट कोरलेली असायची जेणेकरून शिक्का कागदावर उमटवताना तो सरळ उमटेल.
  • महाराणी येसूबाई यांची मुद्रा उमटलेले कुठलेही पत्र अजून उपलब्ध झालेले नाही.