तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांनी कागदपत्रे व बायोमॅट्रिकसाठी उपस्थित राहावे : नागेश पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील तलाठी पदभरती 2023 साठी टि.सी.एस. कंपनीमार्फत घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.satara.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द केली आहे. सदर निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत कागदपत्रे तपासणी व टी.सी.एस. कंपनीमार्फत बायोमेट्रीक तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणी प्रक्रियेसाठी निश्चित केलेल्या आलेले दिनांक, वेळ व ठिकाण, इ. बाबतचा तपशिल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कागदपत्रे तपासणी प्रक्रियेसाठी निश्चित केलेले दिनांक, वेळ व ठिकाण, इ. बाबतचा तपशिल प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नागेश पाटील ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी पाटील म्हणाले कि, दि. 5 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग- अराखीव, निवड यादी – अ.क्र. 1 ते 48, एकूण उमेदवारांची संख्या – 48, दि. 6 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग- अराखीव, प्रतिक्षा यादी अ.क्र. 1 ते 40, एकूण उमेदवारांची संख्या – 40, दि. 7 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग- अनुसूचित जाती- निवड यादी – अ.क्र. 1 ते 20- एकूण उमेदवारांची संख्या-20, प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 17- एकूण उमेदवारांची संख्या-17, सामाजिक प्रवर्ग- अनुसूचित जमाती – निवड यादी – अ.क्र. 1 ते 10- एकूण उमेदवारांची संख्या-10, दि. 8 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग -अनुसूचित जमाती- प्रतिक्षा यादी अ.क्र. 1 ते 9- एकूण उमेदवारांची संख्या-9, सामाजिक प्रवर्ग -वि.जा.अ.- निवड यादी – अ.क्र. 1 ते 7- एकूण उमेदवारांची संख्या-7-प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 9- एकूण उमेदवारांची संख्या-9, – सामाजिक प्रवर्ग – भ.ज.ब.- निवड यादी अ.क्र. 1 ते 7- एकूण उमेदवारांची संख्या-7,

प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 8, – एकूण उमेदवारांची संख्या-8, दि. 9 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग -भ.ज.क- निवड यादी अ.क्र. 1 ते 9, एकूण उमेदवारांची संख्या-9, प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 11- एकूण उमेदवारांची संख्या-11, सामाजिक प्रवर्ग – भ.ज.ड.- निवड यादी अ.क्र. 1 ते 3- एकूण उमेदवारांची संख्या-3, प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 6, – एकूण उमेदवारांची संख्या-6, सामाजिक प्रवर्ग -वि.मा.प्र.- निवड यादी अ.क्र. 1 ते 2- एकूण उमेदवारांची संख्या-2, प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 3, – एकूण उमेदवारांची संख्या-3,

दि.12 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग -इ.डब्ल्यू.एस.- निवड यादी अ.क्र. 1 ते 12, एकूण उमेदवारांची संख्या-12, प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 10- एकूण उमेदवारांची संख्या-10, सामाजिक प्रवर्ग -इ.मा.व- प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 22- एकूण उमेदवारांची संख्या-22, दि. 13 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग -इ.मा.व- निवड यादी अ.क्र. 1 ते 37- एकूण उमेदवारांची संख्या-37 कागदपत्रे तपासणीचे ठिकाण व वेळ- जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन, सकाळी 11.00 वा टी.सी.एस. कंपनीमार्फत करणेत येणाऱ्या बायोमेट्रीक तपासणी प्रक्रियेसाठी निश्चित केलेले दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC), विभागीय कार्यालय सातारा, कँटीन हॉल, तळ मजला. (जिल्हाधिकारी कार्यालय सातारा चे समोर) येथे करण्यात येणार आहे.

यामध्ये संख्या-निवड यादी-155, प्रतिक्षा यादी-135, एकुण-290 अशा उमेदवारांची बायोमेट्रीक तपासणी करण्यात येणार आहे. तरी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा चे www.satara.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. 23 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यायील निवड व प्रतिक्षा यादीतील सर्व उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेमार्फत करणेत येणाऱ्या कागदपत्रे तपासणीसाठी व टि. सी. एस. कंपनीमार्फत करणेत येणाऱ्या बायोमेट्रीक तपासणीसाठी वरील नमूद दिनांक, वेळी व ठिकाणी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह बिनचूकपणे उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र्र’शी बोलताना केले.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : नागेश पाटील

सातारा जिल्ह्यात तलाठी पदभरती 2023 साठी TCS कंपनीमार्फत घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा निवड समिती, सातारा यांनी निवड केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत कागदपत्रे तपासणी व टी.सी.एस. कंपनीमार्फत बायोमेट्रीक तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’च्या माध्यमातून केले आहे.