बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या 10 वर्ष पुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : नागेश पाटील

0
182
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । बेटी बचाव बेटी पढाओ योजनेला 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे दि. 8 मार्च पर्यंत आयोजन करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिले.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महिला हेल्प लाईन-181 आणि चाईल्ड हेल्प लाईन-1098 चे शैक्षणिक कार्यक्रम आणि प्रचार प्रसिध्दी जनजागृती करावी तसेच वृक्षारोपण, महिला पोलीस कर्मचारी व इतर विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांची बाईक, सायकल रॅली, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजने अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी जनजागृती मोहिम आणि नाव नोंदणी मोहिम यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचेही निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी बैठकीत महत्वाचे असे मानसिक आरोग्याबाबत जागरुकता मोहिम, शासकीय कार्यालयांना भेटी, भारतीय न्याय संहितेमध्ये महिलांसाठीच्या तरतुदी जनजागृती यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचेही निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले. शासनाच्या आलेल्या निर्देशाची व उपक्रमांची माहिती महिला व बाल विकास अधिकारी श्री. तावरे यांनी बैठकीत दिली.