कराड शहरात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली मतदान संदर्भात सामुदायिक शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ साठी इच्छुकांकडून आपले उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभेसाठी जिल्ह्यात शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी प्रशासनाकडाऊन देखील मतदान जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्याच्या वतीने कराड शहरात मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची शपथ देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने घेण्यात आली.

45 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीला प्रारंभ झाला असून निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जागृती करण्यात येत आहे. कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरात पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने नुकतीच पायी पदयात्रा काढून शहरातील मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली.

यावेळी “आपल्या मतामुळे होणार लोकशाहीचा सन्मान..अवश्य करा मतदान” अशा प्रकारच्या विविध घोषणा देत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर मतदान करण्यासंदर्भात सामुदायिक शपथ घेण्यात आली. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान हे कर्तव्य समजून करण्याचा यावेळी निश्चय करण्यात आला. या मतदान जनजागृतीच्या उपक्रमात पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.