Mumbai High Court चा सातारा न्यायालयातील 2 न्यायमूर्तींना दणका ! दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने आज एक महत्वपूर्ण आदेश देण्यात आला. यामध्ये सातारा न्यायालयातील दोन न्यायमूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. दिलेल्या आदेशानुसार एका न्यायमूर्तींना पदावनतीला सामोरे जावे लागले असून दुसऱ्या न्यायमूर्तींना तात्काळ बदली आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी सातारा बार असोसिएशनने प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे आणि दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्यावर काही कारणाने कामकाजावर बहिष्कार टाकला होता. तसेच याबाबतची कल्पनाही हायकोर्टाला दिली होती. त्यास अनुसरुन गेले दोन दिवस उच्च न्यायालयाची कमिटी साताऱ्यात ठाण मांडून होती.

याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे जाताच उच्च न्यायालयाने प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांच्या पदावनतीचे आदेश काढून त्यांची बदली पुणे येथे जिल्हा न्यायाधीश एक म्हणून केली आहे. तसेच दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांना आजच्या आज व दुपारीच न्यायालयाचे काम सुरु असताना चार्ज सोडून नागपूरला बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दोघांनाही बदलीच्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्याचेही आदेश आहेत.