सातारा प्रतिनिधी । एकीकडे जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील काही गावात व वाड्या वस्त्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. तर दुसरीकडे दुष्काळाशी पाणी टंचाईशी दोन हात करत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून पाण्याचे संचयन करणारी गावे देखील आहेत. या गावांना सध्या परदेशातीलअभ्यासकांनी नुकतीच भेट दिली आहे. फ्रान्स येथून सेंद्रिय शेतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक श्रीमती केरिलीना या सातारा जिल्ह्यात आल्या आहेत. त्यांनी नुकतीच २०१६ मध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कोरेगाव तालुक्यातील वेळू गावास भेट दिली. या गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्याशी संवाद साधत त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामाची देखील पाहणी देखील केली.
फ्रान्स येथून सातारा जिल्ह्यात आलेल्या श्रीमती केरीलीना यांना फ्रान्समध्ये सेंद्रिय शेतीचा अभ्यास आहे. त्यांनी शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात जिल्ह्यातील दुष्काळी भागांना भेट येत तेथील दुष्काळी भागांची पाहणी देखील केली. तसेच जलसंधारणाची कामे करणाऱ्या काही गावांना देखील भेटी दिला. यावेळी त्यांनी तेथील पाण्याची भासत असलेली टंचाई तसेच त्याबाबत शासनम, ग्रामस्थांकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती देखील घेतली.
या दरम्यान, श्रीमती केरीलीना यांनी पाणी फाउंडेशनच्याद्वारे आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आणि फार्मर कप स्पर्धा यामध्ये काम करणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील वेळू गाव जे २०१६ मध्ये राज्याचे प्रथम पाणी फाउंडेशनमधील विजेते मिळवलेले आहे, खटाव तालुक्यातील भोसरे गाव ज्याने २०१७ मध्ये द्वितीय क्रमांक विजेता मिळवलेले आहे, खटाव तालुक्यातील वरुड आणि तरसवाडी या दोन गावांना भेटी दिल्या.
वेळू गावास ज्यावेळी फ्रान्सच्या अभ्यासिका श्रीमती केरीलीना यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, सुखदेव भोसले, सरपंच दुर्योधन ननावरे, उपसरपंच वैभव भोसले, माजी सरपंच पूनम प्रवीण भोसले, प्रवीण भोसले तसेच गामपाच्यात सदस्य माधुरी भोसले, राहुल मगर, काकासो जगताप आदींसह ग्रामस्थ आणि महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.
गावकऱ्यांशी साधला थेट संवाद
बेलवाडी ते वेळू या दोन्ही गावांदरम्यान नैसर्गिक पद्धतीने चार तलाव जोडले गेले आहेत आणि जे अतिरिक्त होणारे पाणी ते चार तलावामध्ये विभागले गेले आहेत. त्याचा फायदा उन्हाळ्यामध्ये दोन्ही गावांना होत आहे. या गावाला ज्यावेळी श्रीमती केरीलीना यांनी भेट दिली तेव्हा त्यांनी प्रामुख्याने माथा ते पायथा या भूभागावरील केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा अभ्यास केला. चारही गावातील २०२३ रोजी पडलेल्या पावसाच्या गावाच्या नोंदी घेतल्या. स्पर्धेत सहभागी असलेल्या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. आणि जल संधारणाची कामाचा गावातील लोकांच्या जीवनावर तसेच पर्यावरणावर नेमका कोणता परिणाम झाला आणि त्याचा फायदा काय झाला याची माहिती घेतली. तसेच गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी दरवर्षी निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जल संधारण करणे किती महत्वाचे आहे हे समजून घेतले. खटाव तालुक्यातील भोसरे या गावात गेल्यानंतर सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट यांच्यासोबत संवाद साधत असताना त्याच्याकडून पाणी फहाऊंडेशन च्या फार्मर कप बद्दल व त्यांच्या प्रवास व अनुभव जाणून घेतला.
ग्रामस्थांनी डॉ. पोळ यांना केले महत्वाचे आवाहन
वेळू गावचे सरपंच दुर्योधन ननावरे यांनी पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांना वेळूत अजून जलसंधारणाच्या कामांना वाव असल्याचे सांगितले. ज्याच्यामध्ये तलावाचा गाळ काढणे आणि डोंगर पायथ्याला असलेल्या खोल सलग समतल चर काढण्याची आवश्यकता आहे. त्यावेळी डॉक्टरांनी आवाहन केले कि पुन्हा स्पर्धेत भाग घ्यावे आणित्या माध्यमातून कामे सुरु करावीत जेणेकरून सामाजिक संथाची त्या कामाचा जोड देता येईल. स्पर्धेच्या निमित्ताने आपण स्मार्ट शेतीकडे वळू शकतो. त्याचा परिणाम आपले उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यास मदत होईल त्यासाठी गावातील पाच उत्साही शेतकऱ्यांनी प्रशिक्षणासाठी जाणे आवश्यक आहेत, असे डॉ. पोळ यांनी सांगितले.
हिवरे बाजारच्या सरपंच पोपटराव पवार यांच्या भेटीला
सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातील गावांना भेटी दिल्यानंतर फ्रान्स येथील अभ्यासक श्रीमती केरिलीना या आज हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या भेटीसाठी गेल्या आहेत. त्याठिकाणी भेटी देत त्यांच्याशी शेतीसंदर्भात अनेक महत्वाच्या मुद्द्याविषयी त्या संवाद साधणार आहेत.