उदयनराजेंची जिप्सी राईड, चाहत्यांना दिला ‘फ्लाईंग किस’!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आपल्या हटके स्टाईल आणि डायलॉगमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिप्सी राईड केली आहे. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी फ्लाईंग किस दिली आहे. त्यांच्या या फ्लाईंग किसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसभा सभागृहात राहुल गांधींनी दिलेल्या ‘फ्लाईंग किस’वरून मोठा गदारोळ झाला होता. मात्र, साताऱ्यात खासदार उदयनराजे असे अनेकवेळा ‘फ्लाईंग किस’ आपल्या चाहत्यांना देत असतात. अशाच किस्सा नुकताच साताऱ्यात घडला आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे आपल्या चाहत्यांसाठी कधी काय करतील, याचा नेम नसतो.

जानेवारी २०२२ मध्ये पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर उदयनराजे चक्क ‘लुंगी’ घालून आले होते. फ्लाईंग किस, कॉलर उडवणे, कार्यकर्त्याला वाढदिनी तोंडाने पेढा भरवून शुभेच्छा देणे, गाड्यांवर स्टंट करणे, अशा हटके स्टाईलमुळे उदयनराजेंचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांचा नुकताच एक ‘फ्लाईंग किस’ देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला असून त्याची चर्चाही खूप होत आहे.