खासदार उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट; मराठा आरक्षणाबाबत चर्चा करीत दिले निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत मराठा आरक्षण व जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात सविस्तर चर्चा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच पाटण विधानसभा मतदार संघात उपस्थित राहून विकास कामांचे लोकार्पण केले. त्यांनी दमदार भाषण करत विरोधकांवर निशाना साधला. त्यानंतर ते मुंबई येथील वर्षा निवासस्थानी गेल्यानंतर या या या याठिकाणी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली.

udayanraje bhosale

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी विविध विकासकामांच्या बाबतीत माहिती देत त्यांच्याशी चर्चा केली तसेच मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी एक निवेदन देखील दिले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते.