सातारा प्रतिनिधी । भारताला जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावून देण्याची सुवर्णमय कामगिरी सातारच्या अदिती स्वामी या 17 वर्षीय खेळाडू मुलीने केली आहे. तिने मिळविलेल्या यशाचं सर्वस्तरातून कौतुक केलं जातंय. तिच्या यशाचं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील केलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे अदितीला शुभेच्छा दिल्या असून अदितीने आज देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी कामगिरी केली आहे. तिने देशाच्या लौकीकाला चार चाँद लावले आहेत, अशा शब्दांत खा. उदयनराजे भोसले यांनी आदितीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून अदितीच्या यशाचं कौतुक करण्यात आले. शिवाय त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून देखील अदितीस शुभेच्छा दिल्या आहेत. साताऱ्यातील अदिती स्वामी हिने ज्युनियर जगज्जेतेपद पटकावल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बर्लिनमधील जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या कंपाऊंड महिलांच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराला पराभूत करून विश्वविजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत अँड्रिया बेक्वेरा हिचा आदितीने (149-147) असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
17 वर्षीय आदिती स्वामी ही वैयक्तिक स्पर्धेत जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली आहे. तिच्या यशानंतर देशासह सातार्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. आदिती स्वामी हिने सातार्याचे नाव जागतिक पटलावर झळकविल्याने सातारकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. सातारकर आदितीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तिच्या आई – वडीलांवर देखील अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. आदितीचे वडील युगपुरूष शिवाजी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, कण्हेर येथे शिक्षक आहेत, तर आई ग्रामसेविका आहे.