ज्या किल्यांवर शिवकार्य करायचे तिथे आमची आपणास शेवटपर्यंत साथ राहील : खा. उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सह्याद्री प्रतिष्ठाण हिंदुस्थान यांच्यासह अनेक शिवभक्तांच्या माध्यमातून व गोडवली ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्या सहकार्यातून उत्कृष्ठ असे तानाजी मालुसरे यांचे स्मारक आज त्यांच्या जन्मभूमीत उभे राहिले याचे मनापासून समाधान आहे. सह्याद्री प्रतिष्ठाण व तमाम शिवभक्तांच्या पाठीशी कायम ठामपणे आम्ही उभे आहोत संपूर्ण राज्यातील ज्या किल्यांवर व ऐतिहासिक ठिकाणी आपणास शिवकार्य करायचे तिथे आमची आपणास शेवटपर्यंत साथ राहील हा शब्द आम्ही यानिमित्ताने देत असल्याचे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे स्मारक अनावरण सोहळा निमित्त आज त्यांची जन्मभूमी गोडवली ता. महाबळेश्वर. जि. सातारा येथे उपस्थित राहून स्मारकाला अभिवादन केले. यावेळी स्मारक अनावरण सोहळा तमाम शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी खा. उदयनराजे भोसले म्हणाले, स्मारक उभारण्यासोबतच त्या महापुरुषांचे कार्य आपल्याला पुढच्या पिढीला समजून सांगणे आवश्यक आहे तसेच त्यांचे विचार आत्मसात करणेही आवश्यक आहे. या शिवकार्यास आम्ही उपस्थित राहिलो आम्ही भाग्यवान समजतो सह्याद्री प्रतिष्ठाण व गोडवली ग्रामस्थ यांचे खूप खूप आभार.

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठाणचे श्रमिक जोजमगुंडे, ठाण्यातील आमदार श्री. संजय केळकर, श्री. राजेंद्र राजपुरे, श्री. विजय भिलारे, श्री उमेश मालुसरे, श्री विनीत पाटील, श्री पंकज चव्हाण, श्री प्रीतम कळसकर, गोडवली ग्रामपंचायत सरपंच, ग्रामस्थ व तमाम शिवभक्त उपस्थित होते.