उदयनराजेंना पुन्हा राष्ट्रवादीत घेणार का? खा. शरद पवारांनी दिलं ‘हे’ भन्नाट उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज सातारा येथे काही कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशीसंवाद साधत अनेक राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया दिली. मात्र, यावेळी पत्रकारांनी त्यांना एक महत्वाचा प्रश्न विचारला तो म्हणजे उदयनराजे भोसले याचं मन भाजप आणि कुठं कुठं लागत नाही, त्यांना तुमच्या राष्ट्रवादीत घेणार का? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला पवारांनी देखील भन्नाट असं उत्तर दिल. तुमच्याकडे काही माहिती दिली आहे का? असा प्रतिप्रश्न करत पवारांनी उदयनराजे यांचं भाजपमध्ये मन लागत नाही आणि इतर कुठे कुठे मन लागत नाही, याची खासगीत माहिती मला द्या…असं शरद पवार म्हणाले. त्याच्या या उत्तराने उपस्थितांमध्येही एकच हशा पिकला.

वास्तविक पाहता खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांचे काही जवळच्या लाडक्या नेत्यांपैकी एक होते. शरद पवार साताऱ्याला आले कि उदयनराजे हे त्यांना न चुकता भेटत. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भूमिका घेतल्याने पवार साहेबांना मित्र श्रीनिवास पाटील यांना उभे करावे लागले.

सप्टेंबर 2019ची पोट निवडणूक आजही लोकांच्या लक्षात

सप्टेंबर 2019ची लोकसभेची निवडणूक झाली होती. या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे साताऱ्याच्या जागेवर निवडून आले होते. मात्र, पुढे तीन चार महिन्यात उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिली आणि त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत जाणे पसंत केले. पुढे पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा दारूण पराभव केला.

शरद पवारांची पावसातली सभा

खासदार शरद पवार यांनी साताऱ्यात सप्टेंबर 2019च्या लोकसभेच्या पोट निवडणुकीवेळी सभा घेतली. ही सभा सुरु असतानाच पाऊस आला. पण या पावसामुळे शरद पवार थांबले नाहीत. शरद पवार यांच्या साताऱ्याच्या या सभेची तेव्हा भरपूर चर्चा झाली. त्यावेळी श्रीनिवास पाटील यांचा दणदणीत विजय झाला. साताऱ्यात मोठं प्रस्थ असतानाही उदयनराजे यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यावेळी उदयनराजे यांच्या या पराभवाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.