सातारा प्रतिनिधी । सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांची गेल्या 75 वर्षांपासून सांगली, सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरला जाणारी रेल्वे गाडी (Indian Railway) सुरू करण्याची मागणी होती. ही मागणी पूर्ण झाली असून खासदार संजय पाटील यांनी हे प्रयत्न केले आहेत. त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे व ॲड. आ. राहुल कुल यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली त्यांनी सातारा ते पंढरपूर रेल्वे मार्ग सर्व्हे करण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी करीत चर्चा देखील केली आहे.
सातारा, कराड, सांगली आणि मिरज येथील विठ्ठल भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) दादर-पंढरपूर गाडीचा व्हाया मिरजमार्गे सातारापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सातारा, सांगली आणि मिरजकरांना मुंबई आणि पंढरपूरसाठी थेट साताऱ्यातून नवी गाडी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सातारा ते पंढरपूर रेल्वे मार्ग उभारून त्याबाबत सर्वे करण्यात यावा अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे.
दिल्ली येथे केंद्रीय रेल्वमंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांची घेतलेली भेट व चर्चेचे भेटीचे फोटो आणि त्याबाबतची पोस्ट आमदार जयकुमार गोरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शेयर केली आहे. टी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.