सातारा जिल्ह्यातील विधानसभेसाठी काँग्रेसमधील इच्छुकांच्या खासदार प्रणिती शिंदे उद्या घेणार मुलाखती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. खासकरून राष्ट्रीय काॅंग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका देखील घेतल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यात देखील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस तयारीला लागली असून सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम उद्या दि. ४ रोजी शुक्रवारी होणार असून प्रदेश काॅंग्रेस कमिटीने निरीक्षक सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या १० इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमीटीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. त्याची यादी प्रदेश कार्यालयाकडेही प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रम उद्यापासून सुरु होत असून ८ ऑक्टोबरपर्यंत जिल्हास्तरावर सुरु राहणार आहे.

निरीक्षक प्रणिती शिंदे या उद्या शुक्रवार, (दि. ४) सकाळी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्याठिकाणी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्या इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. मुलाखती घेतल्यानंतर दि. १० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांच्या मुलाखतीचा गोपनीय अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविणार आहेत.

असे आहेत मतदारसंघनिहाय काँग्रेसकडील इच्छुक उमेदवार

1) फलटण – ज्ञानदेव वरपे
2) वाई – समिता गोरे, जयदीप शिंदे, कल्याण पिसाळ-देशमुख, विराज शिंदे
3) माण – प्रा. विश्वंभर बाबर, रणजितसिंह देशमुख
4) कराड उत्तर – निवास थोरात
5) कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
6) पाटण – नरेश देसाई
7) सातारा – समिता गोरे