सत्तेची दिवाळी करण्यासाठी या सरकारकडून तिजोरीची दिवाळी; खासदार अमोल कोल्हे यांची महायुतीवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । फलटण येथे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण व जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून महायुती सरकारवर निशाणा साधला. “हरियाणा विधानसभेचा निकाल काँग्रेसच्या हाता तोंडाशी आलेला निकाल गेला आणि महाराष्ट्रातील अनेकांना स्वप्न पडू लागली, म्हणून वर्तमानपत्रात जाहीराती येऊ लागल्या. या जाहीरातींमुळे महाराष्ट्रात हरियाणा सारखे काही घडलं तर असे प्रश्न पडू लागले. मी त्यांना सांगितलं हरियाणा सारख महाराष्ट्रात घडू शकत नाही कारण शरद पवार इथे उभे आहेत. सत्तेची दिवाळी करण्यासाठी हे सरकार तिजोरीची दिवाळी करायला चालले, त्या सरकारला घरी पाठवल्याशिवाय थांबायचं नाही, असे खा. डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी म्हटले.

यावेळी खासदार शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी खा. अमोल कोल्हे म्हणाले, आज संपूर्ण महाराष्ट्राने हा निकाल हाती घेतला आहे. गेल्या वर्षी दिल्लीतीन भाजपाच्या नेत्यांनी अनेकांना जबरदस्ती निर्णय घ्यायला सांगितले. अनेकांनी मनाविरुद्ध निर्णय घेतले. पण आता आज होणारा निर्णय सर्वांच्या मनातून होतोय, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

अडीच वर्षात मंत्री, नेते विकत घेता येतात हे दिल्लीकरांनी दाखवले

लोकसभेत मतांची कडकी झाल्यामुळे आता बहीण लाडकी झाली आहे. “गुजरातचे काही नेते दिल्लीत बसले आहेत, ते नेत्यांना भिती घालतात आणि निर्णय बदलायला लावतात. गेली दोन अडीच वर्षी महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू आहेत. गेल्या अडीच वर्षात मंत्री, नेते विकत घेता येतात हे दिल्लीकरांनी दाखवले पण महाराष्ट्र कधीही झुकणार नाही हे आपल्याला दाखवायचं आहे, असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हंटले.