सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे विविध मागण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडीच्यावतीने पालिकेपुढे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनातून झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडीच्यावतीने पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले. पालिकेने उभारलेल्या सांस्कृतिक भवनाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्यावे, झोपडपट्टीवासीयांना 8अचे उतारे द्यावेत, रामगड रस्त्यावर मातंग समाजमंदिर बांधावे, मागासवर्गीय बेघरांना घरकुले द्यावीत आदी मागण्या निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रवीण सपकाळ, महिला आघाडी शहराध्यक्ष सायाराबानू शेख, पूजा कारंडे, मेहबूब शेख, मोहन कारंडे, प्रकाश चव्हाण, सलीम शेख, सागर नाईलकर, शुभम ननावरे, हृषीकेश वायदंडे, अभिजित ननावरे, सनी ननावरे उपस्थित होते.