कराड प्रतिनिधी । कराड – चांदोली मार्गावरील जिंती नाक्यावरभाजीपाला घेऊन जाणाऱ्या टेंपोने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. सुरेश हरिबा धाईंगडे (वय ४१) असे अपघातातील मृताचे नाव आहे. ते येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेत नोकरीस होते.
याबाबात अधिक माहिती अशी की, शनिवारी साडेनऊ वाजता कराडहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या टेंपोने धडक दिली. येथील बस स्थानक परिसरातून कराड- उंडाळे- येवती- जिंतीला जाण्यासाठी असलेल्या क्रॉसिंगवर धाईंगडे हे शेवाळवाडीकडून रात्री साडेनऊच्या दरम्यान काम आटोपून घराकडे निघाले होते. त्यावेळी ते रस्ता ओलांडून पुढे आले.
त्याचवेळी कराडहून रत्नागिरीकडे भरधाव जाणाऱ्या टेंपो क्रमांक (MH 01 BR 1698) ने मोटारसायकल (MH 50 SH 2168) ला जोराची धडक दिली. त्यात त्यांची मोटारसायकलला सुमारे २५० फूट फरफटत नेले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.