कराड प्रतिनिधी । नांदगाव, ता. कराड येथे गणेशोत्सवानिमित्त मोदक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महोत्सवात मोदक बनवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 100 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. त्यात नांदगावच्या पुनम नरेंद्र पाटील यांचा पानमसाला मोदक भारी ठरला. तर ओंडच्या स्वाती जीवन थोरात यांच्या गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक मोदकाला दुसरा क्रमांक मिळाला.
मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे स्मृती मंच यांच्या वतीने नांदगाव व पंचक्रोशीतील महिलांसाठी ‘मोदक बनवा स्पर्धा’ आयोजित केली होती. त्यात 100 वर स्पर्धकांनी भाग घेतला. ग्रामीण भागातील या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला .महिलांच्या एक से बढकर एकच पाककला यावेळी पाहायला मिळाल्या. त्याचे परीक्षण प्रा. डॉ.नरेंद्रकुमार सूर्यवंशी व सोनिका कोरडे यांनी केले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना १ ग्राम ज्वेलरीतील ‘बानू नथ’ भेट देण्यात आली. तर पहिल्या पाच क्रमांक प्राप्त महिलांना अनुक्रमे १ ग्रँमचे गंठण ,लॉंग हार, नेकलेस, बांगड्या अशी बक्षीसे देण्यात आली. विजेत्यांना दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वि. तु. सुकरे-गुरुजी, सचिव एस. टी. सुकरे, उद्योजक विजय कदम, शितल कदम, प्राचार्य आर. बी. पाटील, उज्वला गरुड, दिलीप महाजन आदींच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले.
नांदगावच्या सिंधू मोदक महोत्सवात 100 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग pic.twitter.com/ykBdkT4AEk
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 26, 2023
सुंदर मोदक बनवून जिंकली बक्षिसे
सिंधू मोदक महोत्सवात आयोजित स्पर्धेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत सुंदर आणि स्वादिष्ट असे मोदक बनवले. तसेच त्यांनी आकर्षक बक्षीस जिंकत प्रथम क्रमांकही पटकावले. स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे : प्रथम- पुनम नरेंद्र पाटील (नांदगाव) द्वितीय- स्वाती जीवन थोरात( ओंड) तृतीय- कविता हितेश सुर्वे (नांदगाव ),चतुर्थ- रेखा राजेंद्र आमणे( नांदगाव) पंचम- स्वाती विलास शिंदे (ओंड), उत्तेजनार्थ -निकिता सुनील आमणे (नांदगाव), शुभांगी बालिश थोरात (कालवडे), माधुरी वैभव शेटे (नांदगाव), स्वाती रघुनाथ साळुंखे (नांदगाव), डॉ. मनीषा जयसिंग जाधव (नांदगाव)