शिरवळच्या AK गँगच्या टोळीप्रमुखासह चौघांना मोक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाला तालुक्यातील शिरवळ येथील AK गँगमधील चौघांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई शिरवळ पोलिस ठाण्याच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

टोळी प्रमुख आतीष ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, (वय २१, रा. बौध्दवस्ती शिरवळ ता. खंडाळा), टोळी सदस्य विशाल शेखर वाडेकर (वय २०, रा. कावळे आळी शिरवळ ता. खंडाळा), रामा दादा मंडलिक (वय २१, रा. सटवाई कॉलनी शिरवळ ता. खंडाळा), संजय विजय कोळी (वय २०, रा. संभाजी चौक खंडाळा, ता. खंडाळा) अशी मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगावर, टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणा-या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का) अन्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सूचना दिलेल्या.

त्याच पार्श्वभूमीवर शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फिर्यादी हे त्यांच्या ओळखीच्या मित्राकडे उसने दिलेले पैसे परत घेण्याकरीता चालत जात असताना आरोपी आतिष ऊर्फ बाबु राजेंद्र कांबळे वय २२ वर्ष रा. बौध्दआळी शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा याने मोटारसायकलवरुन फिर्यादी यांना कट मारला म्हणुन फिर्यादीने त्याला विचारणा केली असता आतिष ऊर्फ बाबु राजेंद्र कांबळे याने शिवीगाळ केली व थांब तुला बघुन घेतो तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत तलवारीसारखे लोखंडी हत्याराने मारहाण करुन जखमी केले म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिष्टरी नोंद करण्यात आलेला.

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये टोळी प्रमुख आतीष ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, वय २१ वर्ष रा. बौध्दवस्ती शिरवळ ता. खंडाळा, टोळी सदस्य विशाल शेखर वाडेकर वय २० वर्षे रा. कावळे आळी शिरवळ ता. खंडाळा, रामा दादा मंडलिक वय २१ वर्षे रा. सटवाई कॉलनी शिरवळ ता. खंडाळा , संजय विजय कोळी वय २० वर्षे रा. संभाजी चौक खंडाळा, ता. खंडाळा यांनी टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस निरीक्षक नवनाथ मदने शिरवळ पोलीस ठाणे यांनी नमुद टोळी विरुध्द दाखल असले गुन्ह्यांची माहिती संकलित केली असता त्यांचेवर जुलुम जबरदस्ती करुन हिंसाचाराची धमकी देऊन किंवा अन्य अवैद्य मार्गाने दहशत व बळाचा वापर करुन अपनयन करुन गंभीर दुखापत, गंभीर दुखापत करून जबरी चोरी, जबरी चोरी व जबरी चोरीचा प्रयत्न, खंडणी व जबरी चोरीसाठी गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न घरफोडी चोरी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपींचेविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई करीता पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परिक्षेत्र सुनिल फुलारी यांनी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यांचे कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी करुन सदर गुन्हयास मोक्का कायदयान्वयेची कलम वाढ करणेची परवानगी देवून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण राहुल धस यांच्याकडे देण्यात आला आहे.

मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता पोलीस अधीक्षक, सातारा समीर शेख, व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने शिरवळ पोलीस ठाणे, सपोनि केंद्रे, पोउपनि सतिश अंदेलवार, शंकर पांगारे, तसेच पो.ना. अमित सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, पो.हवा जितु शिंदे, सचिन वीर, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर म- शिरवळ पोलीस ठाणे या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन ०८ मोक्का प्रस्तावामध्ये १०९ इसमांविरुद्ध मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे. तसेच २४ इसमांविरुध्द हद्दपारीसारखी व ०१ इसमास MPDA कायदयान्वये स्थानबध्द करणेत आले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द मोक्का, हद्दपारी, MPDA अशा प्रकारच्या कठोर कारवाया करणेत येणार आहेत.