मराठी पाट्या लावा, अन्यथा खळखट्याक करू; मनसेचा आंदोलनाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहरासह तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. ८ दिवसांत इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावाव्यात अन्यथा मनसे स्टाइलने खळखटयाक आंदोलन करू, असा इशारा कराड येथील मनसे नेत्यांच्या वतीने कराडचे तहसीलदार विजय पवार यांना निवेदनाद्वारे नुकताच देण्यात आला आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्या वतीने तहसीलदार विजय पवार यांना नुकतेच इशाऱ्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले, सतीश यादव, नितीन महाडिक, हणमंत भिंगारदेवे, नितीन शिंदे, अमोल सकट, विश्वास संकपाळ, केतन जाधव, शंभूराजे भिसे उपस्थित होते.

तसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काही व्यावसायिक दुकानाला मराठीत पाटी लावत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्या लावण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना अद्याप इंग्रजीत पाट्या आहेत.

वास्तविक सक्तीपेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काही व्यवसाईक दुकानाला मराठीत पाटी लवत नाही. प्रशासनाने मराठी प[पाट्या न लावणाऱ्या अशा दुकानांचा सर्व्हें करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याविरोधात करावाई करावी. तसेच येत्या आठ दिवसांत सर्व दुकानांना मराठीत पाटया लावण्यात याव्यात. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू आहे.