सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात जो काही इगो वॉर सुरू आहे. एकाने भिंतीवर चित्र रंगवलं म्हणून दुसऱ्याने स्मारकाचा विषय काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा सातारची छत्रपती शाहू महाराज यांच्याबाबत कोणतीही तडजोड कोणीही करणार नाही. सुरू असलेले इगो वॉर दोन्ही नेत्यांनी थांबवावे. पालकमंत्र्यांनीच याबाबतीत सामंजसपणा दाखवावा उदयनराजेंशी बोलण्यात काही अर्थच नाही कारण उदयनराजे हे स्वतःच्याच विश्वात सतत असल्यामुळे त्यांच्याकडून भूमिका घेतली जाईल अस वाटत नसल्याचे सांगत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दोन्ही नेत्यांची कान उघडणी केली आहे.
साताऱ्यात शिवतीर्थ परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे नव्याने आयलँड तयार करण्याची भूमिका काल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली. तर त्यांच्या भूमिकेवरून आक्रमक झालेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी या ठिकाणी काहीही होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. या दोघांच्या वादावर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना प्रतिक्रिया दिली.
शिवतीर्थावरील वादाप्रश्नी आमदार शिवेंद्रराजेंकडून उदयनराजे अन् पालकमंत्र्यांची कानउघडणी; म्हणाले की… pic.twitter.com/QEO9atWKJY
— santosh gurav (@santosh29590931) June 17, 2023
यावेळी आ. शिवेंद्रराजे म्हणाले की, साताऱ्यातील शिवतीर्थ या परिसरास पूर्वी आपण पोवई नाका असे म्हणत होतो. आता त्याला शिवतीर्थ असे नाव देण्यात आले आहे. शेवटी लोकांच्या भावनांचा आदर हा प्रत्येकाने ठेवला पाहिजे. आपण सर्वजण लोकप्रतिनिधी आहोत. शेवटी शिवतीर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व त्या ठिकाणी ज्या गोढती आहेत हे म्हणणे सोपे आहे. मात्र, तशा भावना लोकांच्या नाहीत हे पालकमंत्र्यांनी लक्षात घ्यावे, असे शिवेंद्रराजेनी म्हंटले.