कराड प्रतिनिधी । कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कमी वयात निवडून आलेले आणि लोकांच्या विकासासाठी सदैव झटणारे माण येथील आमदार अशी जयकुमार गोरे यांची ओळख. 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीन वेळा ते विधानसभा निवडणूक जिंकले. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होते. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवात त्यांनी वाजवलेला ढोलचा होय.
भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी नुकतीच म्हसवड येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवास उपस्थिती लावली. यावेळी महोत्सवस्थळी धनगर बांधव ढोल घेऊन नाले होते. त्यांनी आमदार गोरेपुढे सादर केलेल्या गजी नृत्याने आमदार गोरे भारावून गेले. त्यांनी ढोल हातात घेत ढोल वाजवून ठेका धरला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
आमदार जयकुमार गोरेंनी गजी नृत्यावर ढोल वाजवत धरला ठेका pic.twitter.com/9YRreWOH6j
— santosh gurav (@santosh29590931) June 17, 2023
माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला काही दिवसापूर्वी रात्री अपघात झाला होता. पुणे पंढरपूर रस्त्यावरील फलटण येथे त्यांची गाडी नदीत पडून गोरे आणि इतर तीनजण जखमी झाले होते. अपघातामुळे त्यांना पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात होते. आता अपघातानंतर त्यांनी पक्षाच्या तसेच इतर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला नव्हता. उपचारानंतर बरे झाल्यानंतर आता ते कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. दोन दिवसांपूर्वी आमदार गोरे म्हसवड येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी ढोल वाजवत गजी नृत्यात सहभाग घेतला.