वाकुर्डे योजनेच्या पाणी वाटपाचा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी घेतला आढावा; म्हणाले, पाण्याचा एक थेंब अन् थेंब…

0
574
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी कराड तालुक्यातील वाकुर्डे योजनेवर अवलंबून असलेले २२ हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी .४७ टीएमसी पाणी राखीव आहे. या पाण्यातील एक आणि एक थेंब कराड तालुक्याला देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती आ. डॉ. भोसले यांनी दिली.

कराडात पार पडलेल्या बैठकीला टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, वर्ण उपसा जलसिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, लघुपट बंधारे सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बूब, वर्ण उपसा जलसिंचन प्रकल्पाचे उपअभियंता अनिल लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर आमदार डॉ. भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, या बैठकीमध्ये कराड तालुक्यासाठी वाकुर्डे योजनेमध्ये ४७ पीएमसी पाणीसाठा राखीव आहे. या पाणीसाठ्याच्या वापरासंदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. वाकुडेच्या कराड तालुक्यातील लाभक्षेत्रातील तब्बल २२ सेक्टर जमीन ओलिताखाली येण्यासाठी
४७ टीएमसी पाणी मिळणे आवश्यक आहे.

या योजनेवर असलेल्या कराड तालुक्यातील बंधाऱ्यांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये कराड तालुक्यासाठी राखीव असलेल्या पाण्याचा थेंब अन् थेंब कराड तालुक्याला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच वाकुर्डे योजनेचे नियमित पाणी सर्व परिसराला मिळणार असल्याबाबत प्रशासनाने खात्रीशीर शब्द दिला आहे. त्यामुळे दरवर्षी केळगाव आणि कॉलेज जिल्हा परिषद गटातील गावांची पाण्याचे अडचण दूर होणार होणार असून त्यांना नियमित पाणी मिळणार आहे.

तसेच ८११९ योजनेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ मध्ये धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यातील १९ टक्के पैसे शेतकऱ्यांना भरावी लागणार होते. त्याचाही फार कमी व्हावा, या दृष्टीने बाकुर्डे योजनेवर सोलर सिस्टीम लावण्यासाठी त्याचे इस्टिमेट करण्याच्या सूचना आपण प्रशासनास दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी कराड परिसरातील विशेष प्रश्न मार्गी लावण्याचे बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक गावाच्या पाण्याची मागणीसंदर्भात जलसंपदा विभागाने लेखी प्रस्ताव मागवले आहेत. त्यानुसार त्यांना अपेक्षित पाणी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाईल, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.