कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून आ. बाळासाहेब पाटील यांनी सुमारे 79 कोटी रूपयांच्या विविध विभागाकडील कामांना मंजूरी मिळवली होती. त्यास शिंदे-फडणवीस सरकारने दि. 18/07/2022 व 21/07/2022 च्या शासन आदेशाने स्थगिती दिली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या कामांवरील स्थगिती उठवण्याबाबत आदेश दिलेला होता. राज्य सरकारने नुकताच महाविकास आघाडी सरकारच्या विकासकामावरील स्थगिती आदेश उठविला. त्यानुसार कराड उत्तरमधील महाविकास आघाडीच्या काळातील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविण्यात आला आहे.
राज्यात देण्यात आलेल्या स्थगिती आदेशामधील उच्च न्यायालयाने राज्यभरात सुमारे ८३ याचिका निकाली काढल्या व निकाल याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागला. त्यानंतर राज्य शासनाने दि. 29/09/2023 रोजी एक स्वतंत्र आदेश मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांचेवतीने काढन्याय आला. त्यामध्ये दि.18/07/2022 व 21/07/2022 या रोजीचे स्थगीती आदेश सरसकट उठविण्यात आल्याचे नमुद केलेले. त्यामुळे आ. बाळासाहेब पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या सुमारे 62 कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल व सदरची कामे प्रत्यक्षात सुरू होणार आहेत.
दरम्यान, आ. बाळासाहेब पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या 62 कोटींच्या विकासकामांमध्ये रा.मा.140 ते ब्रम्हपूरी-अंगापूर-निगडी-कामेरी-फत्यापूर-देशमुखनगर- जावळवाडी फाटा-वेणेगांव-कोपर्डे-तुकाईवाडी-कालगांव रस्ता प्रजिमा.110 कि.मी. 23/900 ते 24/250 व कि.मी.25/400 ते 25/650 ची सुधारणा (चढ सुधारणा) करणे ता. जि. सातारा रक्कम रूपये 95 लक्ष, रा.मा.140 ते तासगांव-अंगापूर-वर्णे-अपशिंगे-तासगांव रस्ता प्रजिमा.37 कि.मी.19/500 ते 24/500 (भाग-नागठाणे-गणेशखिंड-सासपडे) ची सुधारणा करणे ता.जि.सातारा. रक्कम रूपये 380 लक्ष, खंडाळा-कोरेगांव-रहिमतपूर-कराड-सांगली रस्ता रा.मा.142 वरील कि.मी. 65/500 मधील रहिमतपूर चौकाची सुधारणा करणे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 500 लक्ष, सासपडे-निसराळे-तारगांव-वाठार-आर्वी-नागझरी रस्ता प्रजिमा.35 कि.मी. 19/100 ते 22/00 (भाग-मोहितेवाडी ते वाठार) ची रूंदीकरणासह सुधारणा करणेे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 237 लक्ष.
राष्ट्रीय महामार्ग 548 सी ते खिरखिंड-एकंबे-कण्हेरखेड-अपशिंगे-साप-पिंपरी -वाठार किरोली रस्ता प्रजिमा.33 अ कि.मी.4/00 ते 6/00 (भाग-शेल्टी ते एकंबे) ची सुधारणा करणे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 190 लक्ष, राष्ट्रीय महामार्ग 548 सी ते खिरखिंड-एकंबे-कण्हेरखेड-अपशिंगे-साप-पिंपरी -वाठार किरोली रस्ता प्रजिमा.33 अ कि.मी.9/500 ते 12/00 (भाग-एकंबे ते अपशिंगे) ची सुधारणा करणे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 332 लक्ष, राष्ट्रीय महामार्ग 548 सी ते खिरखिंड-एकंबे-कण्हेरखेड-अपशिंगे-साप-पिंपरी -वाठार किरोली रस्ता प्रजिमा.33 अ कि.मी.18/00 ते 20/00 (भाग-साप ते पिंपरी) ची सुधारणा करणे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 190 लक्ष, राष्ट्रीय महामार्ग 548 सी ते खिरखिंड-एकंबे-कण्हेरखेड-अपशिंगे-साप-पिंपरी -वाठार किरोली रस्ता प्रजिमा.33 अ कि.मी.22/50 ते 24/100, 25/900 ते 26/500 (भाग-पिंपरी ते वाठार) ची सुधारणा करणे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 95 लक्ष आदींसह इतर कामांचा समावेश आहे.