कराड प्रतिनिधी | राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आता अजित पवार असे तिघांचे मिळून महायुतीचे सरकार आहे. नुकतेच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बंडखोरी करत भाजप व शिंदेंसोबत सरकारमध्ये गेल्यामुळे शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता बाहेर पडू लागली आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली होती. तत्पूर्वी बैठकीआधी मंत्री शंभूराज देसाई यांनी जर उद्धव ठाकरेंनी साद दिली तर आम्हीही सकारात्मक प्रतिसाद देऊ, असे सूचक विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, जर उद्धव ठाकरेंनी साद दिली तर सकारात्मक प्रतिसाद देऊ, अद्याप तरी आम्हाला तसा प्रस्तावर आला नाही. त्यामुळे जर अशी साद ठाकरे गटाकडून दिली गेली तर त्यांना आमच्याकडुन प्रतिसाद नक्की दिला जाईल.
https://fb.watch/lAb6VgOQep/?mibextid=Nif5oz
वास्तविक पाहिल्यास नेहमीची ही राजकारणातील पद्धत आहे. जर कुणी आपल्याला सकारात्मक साद घातली तर तो प्रस्ताव आपण लगेच नाकारत नाही. त्यावर विचार करु असे म्हणतो. म्हणून मी असे म्हटले आहे. पण विचार करणारा मी एकटा नाह, आमचे नेते आहेत.
सुरुवातीला महाविकास आघाडी नको असे आम्ही म्हटले होते. आपण आपल्या मित्रपक्षाला भाजपाला साद देऊया, असे आम्ही म्हटले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी मी म्हणालो होतो की, आता आम्हाला उद्धव ठाकरे यांनी आशिर्वाद द्यावा, त्यावेळी पण मी म्हटले होते, झाले ते झाले दोन अडीच वर्ष त्यामुळे मी म्हणालो असल्याचे ठाकरेंनी सांगितले.
दीपक केसरकरानी ठाकरेंना महाराष्ट्र दौऱ्यासाठी दिल्या शुभेच्छा
शिंदे – फडणवीस सरकारमधील नेते दीपक केसरकर यांनी आज माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली. उध्दव ठाकरे हे जर महाराष्ट्र दौरा करत असतील तर त्यांच्या दौऱ्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या.