सातारा प्रतिनिधी । कधी शांत तर कधी हसमुख आणि मनात आणलं तर जनतेसाठी कायपण असे म्हणत कॉलर उडवत बिनधास्त डान्स करणाऱ्या सातारच्या भाजप खासदार उदयनराजे भोसले याना सर्वचजण ओळखतात. तर याउलट उत्तम संसद पट्टू आणि शिंदे गटाचे आमदार, साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांच्याकडे पाहिले जाते. मध्यंतरी दोघांच्यात काही विषयांवर वाद चालले होते. मात्र, आता या दोघांची चांगली गट्टी जमल्याचे पहायला मिळत आहे. असाच प्रसंग आज साताऱ्यात घडला. ‘राजे फक्त तुम्हीच,’ असे मनाशी काही म्हणत पालकमंत्री देसाईंनी खासदार उदयनराजे भोसले यांना वाकून मुजरा घातला. आणि राजेंनी देखील ते जात असताना पालकमंत्र्यांना बसण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. दोघ्यांच्यातील या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
सातारा म्हटलं कि छत्रपती आणि खासदार उदयनराजे बसोले यांचे नाव समोर येते. आपल्या कॉलर उडवण्याच्या असलेल्या हटके स्टाइलमुळे उदयनराजे प्रत्येकाला आपलेसे वाटतं. त्यांचा चाहता वर्ग देकील खूप आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात साताऱ्यात ऐका विष्यवारून शंभूराज देसाई आणि उदयनराजे या दोघांमध्ये वादावादीचे खटके उडाले होते. त्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले होते. आता मात्र, ते काहीसे निवळताना दिसत आहे. कारण दोघांच्यात आता एकमेकांमध्ये चांगले संवाद होत आहेत.
आज सातारा शहरात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेत घेतली . दोघांमध्ये बऱ्याचवेळ अनेक विषयावर चर्चा झाली. चर्चेनंतर मंत्री देसाई परत निघाले असता खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या गाडीचा दरवाजा उघड्यासाठी पुढे जाऊ लागले. राजेंकडून आपल्या गाडीचा दरवाजा उघडला जात असल्याचे पाहिल्यावर मंत्री देसाई यांनी देखील राजेंसोबत चेष्टा करीत “आता मी चालत जातो… राजे तुम्ही काहीही करता” असे म्हटले. यावर राजेंनी त्यांना गाडीत बसण्याची विनंती केली.
राजेंच्या या कृतीनंतर मंत्री देसाईंनी देखील राजेंना वाकून मुजरा घातला. दोघांच्यातील हा घडलेला प्रसंग त्याठिकाणी उपस्थित असलेल्या दोघांच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी आपल्या कॅमेऱ्यात चित्रीत केला. तसेच कुणी उदयनराजेंनी मंत्र शंभूराजेंच्या गाडीचा उघडला दरवाजा, तर कुणी पालकमंत्र्यांनी उदयनराजेंना घातला मुजरा असे लिहीत दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला.