ठाकरेंकडून शिंदे गटात गेल्यावर काय काय मिळाले? मंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । ठाकरे गटात असताना त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा असा जवळचा कुठलाच जिल्हा दिला नाही. मला जवळचा जिल्हा द्यायच्या ऐवजी त्यांनी सातारा जिल्ह्यातून उचलून ९०० कि मी लांब अशा सहा तालुक्याच्या वाशीम जिल्ह्यात नेऊन टाकलं. ३ आमदार व अर्धा खासदार असलेल्या वाशीम जिल्ह्याचं पाल्कमंत्रीपद मला दिलं. मात्र, मुख्यमंत्री शिंदेसोबत गेल्यावर त्यांनी मला खूप काही दिले. प्रथम सातारा जिल्ह्याचं पाल्कमंत्रीपद दिले. राज्य उत्पादन शुल्क मंत्रीपद दिले. अनेक विभागांची खाती दिली. मतदार संघासाठी अनेक विकासकामांना भरघोस निधी देखील दिला, असे मंत्री देसाई यांनी भर ई-भूमिपूजन सोहळ्यात सांगितले.

शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे आज वर्षपूर्ती मेळावा व पाटण विधानसभा मतदार संघातील १२८ गावातील १२२ कोटी ५६ लक्ष रुपयांच्या ८६ विकास कामांचा, ई-भूमिपूजन सोहळा आज पार पडला. यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आज आमच्यावर अनेकजण टीका करत आहेत. खासदार संजय राऊत यांनी देखील नुकतीच काही दिवसापूर्वी माझ्या मतदार संघात येऊन माझ्यावर टीका केली. मात्र, त्यांच्या टीकेला मी काहीही उत्तर दिले नाही. विरोधकांनी कितीही टीका केली कि त्यांना कामातून उत्तर द्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे आमच्यापेक्षा आमचे काम बोलते.

शंभूराज देसाईला जर पाटण विधानसभा मतदार संघात पराभूत करायचं आहे असे म्हणत असाल तर एकच सांगतो. संजय राऊत माझ्या मतदार संघात येऊन माझ्या विरोधात निवडणुक लढवून दाखवावी आणि मला निवडणुकीत पाडून दाखवावे, असे थेट चॅलेंज शिवसेना खा. राऊत यांना पालकमंत्री देसाई यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीमध्ये लहान – मोठे ७ घटकपक्ष काम करत आहेत. महाराष्ट्र आणि देशाने पाहिले गेल्यावर्षी राजकीय स्थित्यन्तर आपल्या राज्यात घडले. ज्यांना हे पचनी पडले नाही त्यांनी त्याला गद्दारीच नाव दिले. ज्यांना हे सहन झाले नाही त्यांना कुणी खोक्यांचे नाव दिले. परंतु थोडं आत्मचिंतन गेल्या वर्षभरात घडलेल्या या घटनेचं आपण सर्वांनी करणे गरजेचे असल्याचे यावेळी मंत्री देसाई यांनी म्हंटले.

काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर युती करू नका बोलणारा एकमेव आणि पहिला आमदार मी : मंत्री देसाई

२०१९ च्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका शिवसेना व भाजपने एकत्रित लढवल्या. या निवडणुकीत ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार होता त्या ठिकाणी भाजपणे पूर्ण ताकदीने मदत केली. निवडणुका झाल्या निकाल लागले १७० ते १७५ च्या पुढे भाजप व शिवसेना महायुतीचा आकडा गेला. बैठकीसाठी बोलवल त्यानंतर बसमधून एका हॉटेलमध्ये ठेवले. भाजपसोडून काँग्रेस-राष्ट्रवादीला बरोबर घेणार असाल तर आम्हाला ते मान्य नाही असे सांगणारा पहिला आमदार शंभूराज देसाई होता, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.