कराड प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यात संवाद यात्रा काढण्यात येणार असून त्याच्या जिल्ह्यातील नियोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हास्तरीय अधिवेशन आज कराड येथे पार पडत आहे. या अधिवेशनास नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित असून त्यांनी कराड येथील विमानतळाच्या भू संपादनाविषयी महत्वाची माहिती दिली. “कराड येथील विमानतळाच्या जागेसंदर्भात सांगायचे झाले तर विमातळाचा सर्वात मोठा प्रश्न हा भू संपादनाचा असतो. पुढचे काम सोपे असते. भू संपादन हाच त्याच्यातील महत्वाचा विषय आहे. लवकरच हा विषय पूर्ण होईल आणि त्याची पुढची कार्यवाही सुरु होऊन पुढच्या काही महिन्यात विमानतळ सुरु होऊन एअरस्ट्रीप देखील वाढेल, असे केन्द्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी म्हंटले.
कराड येथील भाजपच्या जिल्हास्तरीय अधिवेशनास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित लावली असून तत्पूर्वी त्यांनी प्रीतिसंगम येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ येथे जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी मंत्री मोहोळ म्हणाले की, कराड येथील विमानतळाच्या भू संपादनाविषयी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून माहहती घेतली असून सुमारे ४८ हेक्टर जागेचं भू संपादन करायचे आहे. त्यातील ३८ हेक्टर जागेचे भूसंपादन झाले असून फक्त १० हेक्टर जागेचे भूसंपादन करायची प्रक्रिया बाकी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल. बाकी राहिलेली १० हेक्टर जागेच्या भू संपादनाची प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होईल.
विमातळाच्या विस्तारीकरणातील भू संपादन हाच एक महत्वाचा मुद्दा असतो. एकदा हे काम झाले की, त्याच्या पुढची कार्यवाही चाकू होईल. पुढच्या काही महिन्यात आपलं कराड येथील विमानतळ चालू होऊन एअर स्ट्रीप देखील वाढेल. जवळपास ७० प्रवासी असलेल्या विमानाची वाहतूक उड्डाण या ठिकाणाहून सुरु होईल आणि त्यादृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करत असल्याचे मंत्री मोहोळ यांनी म्हंटले. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी भेट देत अभिवादन केल्यानंतर येथील स्मृतिस्थळाची तसेच कराड येथील विमानतळाची देखील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
महायुतीचेच सरकार मराठ्यांना आरक्षण देणार
मराठ्यांना आरक्षण हवे आहे ते त्यांना मिळायलाच पाहिजे. त्यांच्या या मागणीमध्ये आमची वेगळी भूमिका नाही. जेव्हा २०१४ ते २०१९ मध्ये या राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार होते त्यावेळी त्यांनीच पहिल्यांदा मराठ्यांना आरक्षण दिले. त्यांच्याअगोदर कोणत्याच मुख्यमंत्र्यांने याबाबत निर्णय घेतला नाही. मात्र, जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी निर्णय घेतला आणि तो न्यायालयात देखील टिकला. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तो निर्णय रद्द झाला. आता महायुतीचेच सरकार मराठ्यांना आरक्षण देणार असा आम्हाला विश्वास असल्याचे मोहोळ यांनी यावेळी म्हंटले.
विधानसभेला जिल्ह्यातील राहिलेल्या दोन्ही जागायुतीकडे
सातारा जिल्ह्यात आता पूर्वीसारखी स्थित राहिली नाही. युतीसाठी चांगले वातावरण आहे. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसत नाही. जिल्ह्यातील आठ पैकी सहा आमदार युतीचे आहेत. येत्या विधानसभेला राहिलेल्या दोन्ही जागाही युतीकडे असणार असल्याचे महत्वाचे विधान यावेळी मोहोळ यांनी केले.