Udayanraje Bhosale : मंत्री गिरीश महाजनांनी घेतली खा.उदयनराजेंची भेट; जलमंदिर पॅलेसमध्ये केली कमराबंद चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहे. अशातच सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच भाजपच्या उमेदवार यादीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे नाव नसल्यामुळे उदयनराजे नाराज तर नाहीत ना? अशी चर्चा सध्या सुरु आहे. अशात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात उदयनराजेंची भेट घेतली आहे. दोघांच्यात नेमकी काय कमराबंद चर्चा झाली? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साताऱ्यात लोकसभेसाठी महायुतीतून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी उदयनराजेंच्या समर्थकांकडून गेल्या काही दिवसापासून केली जात आहे. मात्र, याबाबत भाजपमधील एकाही नेत्यांकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. त्यामुळे खा. उदयनराजेंच्या उमेदवारीबाबात शंका निर्माण होऊ लागल्याने आज उदयनराजेंच्या समर्थकांकडून काही दिवसांपूर्वी संताप व्यक्त करण्यात आला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नुकतीच करण्यात आली. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्याच्या हालचाली केल्या जाऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा लिक्सभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांची आज भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. मंत्री महाजन गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. मंत्री महाजन यांच्या भेटीमुळे उदयनराजे यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भेटीत नक्की कशावर होणार चर्चा याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.