Girish Mahajan : उदयनराजेंची उमेदवारी BJP ने अजून का जाहीर केली नाही? मंत्री महाजनांनी सगळंच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज साताऱ्यात जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खा. उदयनराजे भोसले (Udyanaraje Bhosale) यांची भेट घेतली. यावेळी दोघांच्यात कमराबंद चर्चा झाल्यानंतर मंत्री महाजनांनी भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत अजून वेळ का लावला जात आहे? या मागचं सगळंच कारण सांगून टाकलं. त्याचबरोबर त्यांनी खा. उदयनराजेंच्या उमेदवारीबद्दल देखील महत्वाचे विधान केले.

साताऱ्यात जलमंदिर पॅलेस येथे खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सातारा लाेकसभा मतदारसंघातून खा. उदयनराजे भाेसले यांची उमेदवारी डावलण्याचा विषयच येत नाही. उदयनराजे भाेसले यांची उमेदवारी ही पक्षाची गरज आहे. उदयनराजे भाेसले यांनी उमेदवारी मागण्याची देखील गरज नाही. त्यांची उमेदवारी निश्चित आहे. भाजपला त्यांच्या उमेदवारीची गरज आहे. महायुतीत तीन पक्ष असल्याने चर्चा सुरू असल्याने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागत आहे असल्याचे खरे कारण मंत्री महाजन यांनी सांगितले.

खासदार उदयनराजे भाेसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी दाेन्ही नेत्यांमध्ये आगामी काळातील लाेकसभा निवडणुकीविषयी चर्चा झाली. या चर्चेनंतर मंत्री महाजन यांनी आमदार शिवेंद्रराजे भाेसले यांची सुरुची बंगला येथे जाऊन भेट घेत लाेकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली.