मिनी काश्मीर महाबळेश्वरात पर्यावरणाची गुणवत्ता आता डिजिटल स्क्रीनवर

0
1

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रचे नंदन वन म्हणुन ओळख असलेल्या महाबळेश्वर शहराला आता पर्यावरणाची गुणवत्ता आता डिजिटल स्क्रीनवर पहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रगोग महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेतर्फे राबविला जात असून या नव्या प्रयोगात शहरातील प्रमुख चौकात डिजीटल स्क्रीन बसवून पर्यावरणाचे निर्देशांक, शासकीय योजनांची माहिती दाखवण्यास शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या वतीने बसविण्यात आलेल्या या डिजीटल स्क्रीनद्वारे नागरिकांना तापमान, पर्जन्य, आद्रता, आवाजाची तीव्रता आणि हवेची गुणवत्ता यासारख्या पर्यावरणीय निर्देशांकांची माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे, CO2, PM 2.5 आणि PM 10 या प्रदूषणकारी कणांची माहितीही या स्क्रीनवरून पहायला मिळत आहे. यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना शहराच्या पर्यावरणाची गुणवत्ता समजून घेणे सोपे होणार आहे.

महाबळेश्वरचे वातावरण हे अत्यंत सुंदर असल्याने पर्यटकांना या ठिकाणी भ्रमंती करायला आवडते. या नव्या उपक्रमामुळे शहराचे पर्यावरणीय निर्देशांक डिजिटल रूपात उपलब्ध होणार असल्याने पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे. तसेच, महाबळेश्वर शहारातील नागरिकांना आणि व्यवसायिकांनाही याचा फायदा होणार हे नक्की.

महाबळेश्वरचा पारा घासरतोय

सातारा जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते. साधारणपणे डिसेंबरचा मध्य ते जानेवारीची सुरुवात यादरम्यान पारा एकदम खाली येतो. पण, यंदा नोव्हेंबर महिन्यातच कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मागील १५ दिवसांत थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सध्या दररोज पारा घसरत चालला आहे. दरम्यान, महाबळेश्वर शहरात गत आठवड्यात कडाक्याची थंडी वाढली असून पार देखील दिवसेंदिवस घसरत आहे.

महाबळेश्वर शहरात ‘या’ ठिकाणी पहायला मिळतायत डिजिटल स्क्रीन

महाबळेश्वर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, द क्लब चौक, राजभवन रोड महाड नाका, पेटिट लायब्ररी येथे एसटी स्टॅण्डच्या दिशेने अशा चार ठिकाणी या डिजिटल स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत.