मेटगुताडमधील मिनी भुशी डॅम झाला ओव्हरफ्लो; मुसळधार पावसामुळे पडझड सुरूच

0
174
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर शहर व तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसामुळे महाबळेश्वर ते तापोळा रस्ता खचला आहे. याबरोबरच दरडी कोसळणे, घरांच्या पडझडी सुरूच आहेत. दरम्यान, पावसामुळे मेटगुताड येथील मिनी भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला आहे. तर लिंगमळा धबधबाही फेसाळला आहे. मात्र, पावसामुळे बाजारपेठेत शुकशुकाट आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा महाबळेश्वर पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या महाबळेश्वर ते तापोळा मुख्य रस्ता चिखली नजीक मोठ्या प्रमाणावर खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली. झोळखिंड परिसरात वन विभागाच्या हद्दीत महारोळा गावाच्या खालील बाजूस नवीन पाणी प्रवाह निर्माण झाला. यामुळे सर्व राडारोडा रस्त्यावर आला. पाणी प्रहावामुळे पूर्णत्वास गेलेला डांबरी रस्ता पाण्याच्या लोंढ्यामुळे दरीच्या दिशेने खचला व वाहून गेला मुख्य रस्त्यापासून तब्बल दोनशे ते तीनशे फूट खाली वाहून गेला असून दरी निर्माण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबी लावून खड्डा बुजवण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. परंतु, पावसामुळे या कामात अडथळा निर्माण होत आहे. दरडी कोसळण्याचे प्रकार वाढत असल्याने मांघर पारूटमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटामध्ये तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या दगडांनी भरलेला पिंजर्‍याच्या साखळीने बनवलेली गॅबियन भिंत संरक्षक भिंत या परिसरात बांधावी लागणार आहे. तसेच धोकादायक ठिकाणी कर्व वॉल, संरक्षक जाळी बसवण्याची गरज आहे.