सातारा प्रतिनिधी । सध्या भाजपचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या आभार दौऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सातारा जिल्ह्यातच नाही तर राज्य, देशभरात उदयनराजेंच्या कॉलर उडविण्याच्या व त्यांच्या हटके स्टाईलचे अनेक फॅन्स आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांचा एखादा नवीन व्हिडीओ आला की तो सोशल मीडियात लगेच व्हायरल होतोच. शिवाय त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टावरचा फॉलोअर्स देखील लाखोंच्या घरात आहे.
सोशल मीडियावर सध्या कोणता ट्रेंड सुरू आहे, कोणती पोस्ट टाकावी, आपल्यावर होणाऱ्या आरोपांना कसे प्रत्युत्तर द्यावे, यासाठी सोशल मीडियाचे चांगले व्यासपीठ मिळाले आहे. या माध्यमातून आपली पोस्ट जास्तीत जास्त जणांनी वाचावी, यासाठी सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपले फॉलोअर्स वाढवण्याचा आटापिटा नेत्यांचे मीडिया सेल करत असतात. राजकीय नेत्यांकडून सोशल मीडियाचा वापर लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात करण्यात आला.
सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत झाली. तसे पाहिले तर दोघांचाही जिल्ह्यत चांगलाच जनसंपर्क. मात्र, निवणुकीत उदयनराजे जिंकले. या निवडणुकीत उदयनराजेंचे सोशल मीडियावरील नेटवर्क जास्त फायद्याचे ठरले असे म्हणावे लागेल. खा. उदयनराजे भोसले यांची फेसबुक, इन्स्टा आणि एक्सवर स्वतंत्र टीम कार्यरत आहे. उदयनराजे दिल्लीत, साताऱ्यात अथवा राज्याच्या कोणत्याही भागात असोत, त्यांच्याबाबतची अपेडेट्स सोशल मीडियावर पोस्ट केली जाते.
निवडणूक काळात याचा उदयनराजेंना अधिक उपयोग करून घेता आला. त्यांच्या सभा, रॅली सोशल यांचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. अजूनही एखादा कार्यक्रम झाल्यास त्याचे फोटो, व्हिडिओ देखील काही तासात अथवा क्षणात त्याच्या फेसबुक, इन्ट्रा वर पहायला मिळतात. या उलट उदयनराजेंना टक्कर देणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांचीही टीम सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र, या तिन्ही प्लॅटफॉर्मवर नियमित पोस्ट टाकणे, फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्यांना आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.
नवनिर्वाचित खा. उदयनराजेंना नेमके फॉलोअर्स किती?
1) Facebook : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज असून, यावर त्यांचे तब्बल 621K म्हणजे 6 लाख 21 हजार इतके फॉलोअर्स आहेत. याशिवाय त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही त्यांच्या नावाने फेसबुक पेज ओपन केली आहेत. यावर उदयनराजे भोसले यांचे विविध उपक्रम, पोस्ट अपलोड केली जातात. जिल्ह्यातील इतर नेत्यांच्या तुलनेत खासदार उदयनराजेंचे फॅन फॉलोअर्स जास्त आहेत. त्यांच्याबाबत कुठलीही बातमी असो, युवावर्ग लगेच सोशल मीडियावर सर्च करू लागतो.
2) Instagram : सध्या सोशल मीडियात प्रसिद्धीसाठी सर्वात जास्त कोणत्या गोष्टिणची आवश्यकता असेल तर ती इन्स्टाची. या इन्स्टावर खासदार उदयनराजे भोसले यांचे ३ लाख ७६ हजार फॉलोअर्स आहेत. या माध्यमावर युवावर्ग मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो.
3) X : खासदार उदयनराजे भोसले यांचे एक्सवर तब्बल ३ लाख २६ हजार २०० फॉलोअर्स आहेत. सध्या पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यापासून शासकीय कार्यालये, राजकीय पक्षांची मुख्यालय आपले अधिकृत निर्णय एक्सवर जाहीर करत असतात.
शशिकांत शिंदे यांचे किती फॉलोअर्स?
1) Facebook : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांचे फेसबुकवर १ लाख २९ हजार फॉलोअर्स आहेत. मात्र, त्यांचे कार्यक्रम, लग्नातील भेटीगाठी याचे व्हिडिओ आणि फोटो देखील नियमितपणे फेसबुकवर टाकले जातात.
2) Instagram : इन्स्टावर आमदार शशिकांत शिंदे यांचे फॉलोअर्स पहिले तर ते ९१ हजार फॉलोअर्स इतके आहेत. या ठिकाणी शिंदेंची प्रसिद्धी कमीच असल्याची दिसून येते.
3) X : सर्वाधिक महत्त्वपूर्ण अशा एक्सवर शशिकांत शिदे यांचे ६८ हजार ९०० फॉलोअर्स आहेत.