जिल्ह्यातील 11 तालुक्यात होणार आजी माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्याबाबत तालुका समितींची सहामाही बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आजी व माजी सैनिक विधवांच्या महसूल, पोलीस व इतर अडीअडचणीचा निपटारा करण्यासाठी जिल्हयतील ११ तालुक्यात संबंधित तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल हंगे स.दै.दे (निवृत्त) यांनी दिली आहे.

तालुकानिहाय बैठका संबंधीत तालुक्यातील त्या त्या तहसील कार्यालयात होणार आहेत. त्याच्या तारखा व वेळा पुढीलप्रमाणे आहेत, कराड येथे 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा., वाई येथे 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा., महाबळेश्वर येथे 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वा., सातारा येथे 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा., कोरेगाव येथे 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.

फलटण येथे 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा., पाटण येथे 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वा., माण (दहिवडी) येथे 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वा., खटाव (वडूज) येथे 6 नोव्हेंबर दुपारी 3 वा., जावळी येथे 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वा. व खंडाळा येथे 13 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.