कराडात नरेंद्र मोदी तर वाईत शरद पवारांची सभा; कोणाची सभा गाजणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेत राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिलेली आहे. उदयनराजे भोसले आणि सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये सभा होणार आहे. तर, शरद पवार हे देखील आज सातारा जिल्हा दौऱ्यावर असून ते शशिकांत शिंदे यांच्यासाठी वाईत दुपारी तर सायंकाळी फलटणमध्ये सभा घेणार आहेत. दोघांच्यात कुणाची सभा गाजणार हे पहावे लागणार आहे.

दरम्यान, कराड येथील सैदापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तीन वाजल्यानंतर होणार आहे. तर वाईत दुपारी तर फलटणमध्ये सायंकाळी शरद पवारांची सभा होत आहे. या सभासाठी दोन्हीही पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जागा वाटपाच्या तडजोडीतून सातारा लोकसभा मतदारसंघ खेचून आणत भाजपनं या ठिकाणी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील महायुतीच्या नेत्यांना सोबत घेत प्रचार सुरु केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी देखील मतदारसंघात भेटी गाठी, प्रचार फेऱ्या, सभा आदीच्या माध्यमातून प्रचार सुरु ठेवलाय. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील देखील कामाला लागले आहेत. साताऱ्यात 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे.