कराड प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील एकीव येथील धबधब्याजवळील 700 फूट कड्यावरून खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या तरुणांचा धबधब्यात पडून नाही तर त्यांना ढकलून देत त्यांचा खून करण्यात आला होता. दरम्यान या घटनेतील 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर आता तब्बल 72 तासानंतर खुनातील 3 आरोपींचा शोध घेत मेढा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
साहिल मेहबूब शेख, (वय 18 रा. भीमाबाई आंबेडकर नगर, सदर बाजार, सातारा, निखिल राजेंद्र कोळेकर, (वय 23, रा. भीमाबाई आंबेडकर नगर, सदर बाजार, सातारा, आसिफ माजीद शेख, (वय 22, रा. भीमाबाई आंबेडकर नगर,
सदरबजार, सातारा.) अशी अटक करण्यात आले;लया आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १६ जुलै रोजी दुपारी ४.४५ वा. सुमारास एकीव ता. जावली, जि.सातारा येथील धबधब्याचे जवळ दोन अनोळखी इसमांनी दोन इसमांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच त्यांना धबधब्याचे दरीत ढकलून देऊन त्यांचा खून केला असल्याची घटना घडली होती. याबाबत मेढा पोलीस ठाण्यात गुरनं १९४/२०२३ भादंवि कलम ३०२, ३४ प्रमाणे अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकीव धबधब्यावरील खूनाचा गुन्हा पोलिसांकडून 72 तासांत उघड; 3 जणांना अटक pic.twitter.com/JwZOiMvsWu
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 21, 2023
दुहेरी खुनाच्या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी गुन्हा उघड करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार केले.
तपास पथकाने सर्वप्रथम गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवून, घटनास्थळावरील आजूबाजूचे साक्षीदारांच्याकडे विचारपूस केली. तांत्रिक विश्लेषन तसेच एकीव ते सातारा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपास पथक नमुद गुन्हयाचा तपास करीत असताना दि. २० रोजी अरुण देवकर यांना माहिती प्राप्त झाली की, सदरचा गुन्हा ४ इसमांनी मिळून केलेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व तपास पथकास नमुद इसमांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
तर पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व त्यांच्या पथकाने संशईत ३ इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी मयत दोन इसम व त्यांच्यामध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन दोन्ही इसमांना मारहाण करुन दरीमध्ये ढकलून दिले असल्याचे कबूल केले. सदरचा दुहेरी खुनाचा गुन्हा ७२ तासाचे आत उघडकीस आला असून तीनही इसमांना पुढील कार्यवाहीकामी मेढा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, अरुण देवकर, संतोष तासगांवकर, रविंद्र भोरे, विश्वास शिंगाडे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश पाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद ले लेलेश फडतरे, प्रविण फडतरे, सनी आवटे, राकेश खांडके, हसन तडवी, अमित अँड अजय जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, मनोज जाधव, राजू कांबळे, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, प्रविण कांबळे.
विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव, अमृत करपे मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विकास गंगावणे, दत्तात्रय शिंदे, संभाजी बाबर, अभिजीत वाघमाळे, प्रदिप उदागे, निलेश देशमुख, गणेश पोरपडे, वाई पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्नेहल सोमदे, श्रावण राठोड, प्रेमजित शिर्के, प्रशांत ठोंबरे यांनी सहभाग घेतला आहे. कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.