माऊलींच्या पालखीचे फलटण तालुक्यात जल्लोषात स्वागत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यामध्ये कापडगाव येथील सरहद्देच्या ओढ्यावर आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

लोणंद येथील अडीच दिवसांचा मुक्काम संपवून आज माऊलींच्या पालखीचे फलटण तालुक्यात आगमन झाले. माऊलींच्या पालखीचा मुक्काम सोमवारी तरडगाव येथे पार पडल्यानंतर आज पालखीचा मुक्काम फलटण येथे असणार आहे.

कापडगाव येथील सरहद्देच्या ओढ्यावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट, महानंदचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार, लोणंदचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके, बाजार समितीचे संचालक प्रवीण खताळ, निंबोडीचे सरपंच बाळासाहेब शेळके, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तारिक बागवान, कोरेगावचे सरपंच सुनील शिंदे, कापडगावच्या सरपंच अर्चना गेजगे, कुसुरच्या सरपंच दादासाहेब नरुटे, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, पराग भोईटे, वैभव खताळ, शरद खताळ, सुरेश चव्हाण, मनोज चव्हाण, शैलेश भोईटे, संजय चव्हाण, अजित भोईटे, सुनील गरुड, मंजुषा खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.